स्तनपान करणाऱ्या महिला लस घेऊ शकतात? | कोरोनामुक्तीनंतर 3 महिन्यांनी लस | Vaccination after pregnancy

हा प्रश्न सतत विचारला जात आहे कि,

  • कोरोनावर मात केल्यानंतर घरी परतणार्या व्यक्तीला कोरोना लस केव्हा वापरावी?
  • स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घ्यावी कि नाही?

लसीकरणाबाबत NEGVAC च्या 4 सूचनांना मंजुरी

1. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला 3 महिन्यानंतर कोरोना लस दिली जाऊ शकते

2. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांना दुसरा डोस घ्यावा.

3. आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या माताही कोरोना लस घेऊ शकतात.

4. कोरोना लस घेण्यापूर्वी रॅपिड एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नाही.

उत्तर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट झाले आहे. आपणास आता ही लस कोरोनमुक्त झाल्यांनतर ३ महिन्यांनंतर घेता येईल.

कारण, NEGVAC अर्थात (National Expert Group on Vaccine Administration for COVID-19) ने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या कोरोना मुक्तींनंतर ३ महिन्यांनंतर कोरोनावर लस द्यावी, अशी सूचना एनईजीव्हीएसीने केली होती. त्यांच्या या सूचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. (कोरोना मुक्त व्यक्तीला तीन महिन्यांनंतर लस द्यावी)

कोरोना लसचा पहिला डोस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीस कोरोना विषाणूची लागण झाल्यास एनईजीव्हीएसीच्या मते, कोरोना मुक्त झाल्यानंतर ३ महिन्यांनी त्यांनी दुसरा डोस घ्यावा. NEGVAC ने असेही म्हटले आहे की ज्या स्त्रियांचे आपल्या बाळांना स्तनपान चालू आहे, त्यांनी देखील कोरोनाविरूद्ध लस न घाबरता घ्यावी. (vaccination after pregnancy)

तसंच कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांची एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.

NTAGI च्या सूचना केंद्रातून अमान्य

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नॅशनल टेक्निकल अडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशन (NTAGI) यांनी एक शिफारस केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तज्ञांच्या गटाने असे सूचित केले की कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना बरे झाल्यानंतर ६ महिन्यांनंतर कोरोनावर लस द्यावी. त्याचबरोबर गर्भवती महिलांना कोणतीही लस घेण्याचा पर्याय द्यायला हवा असंही सुचवण्यात आलंय. स्‍तनपान करणाऱ्या महिलांना प्रसुतीनंतर केव्हाही लस देता येईल, असंही सांगण्यात आलं होतं.

त्यानंतर NIAGI मंगळवारीही एक सूचना करण्यात आली होती. त्यामध्ये कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लस घेण्यासाठी 6 ते 9 महिन्याचं अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी NIAGI ने कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी 6 महिन्यानंतर कोरोनाची लस घ्यावी असं सांगण्यात आलं होतं. पण आता हे अंतर 9 महिन्यापर्यंत वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Team 360marathi.in

Leave a Comment

close