( सावधान) उद्यापासून whatsapp आणी फोन काँल चे नवीन नियम लागू

मित्रांनो कालपासून असा message सोशल मीडिया वर खूप वायरल होतोय, या पोस्ट मध्ये जाणून घेउया कि काय आहे यामागचा खरा fact

आधी पाहूया कोणता आहे तो message .

Whatsapp Viral Message खालीलप्रमाणे

उद्यापासून whatsapp आणी फोन काँल चे नवीन नियम लागू

०१. सर्व कॉल रेकॉर्डिंग असतील.
०२. सर्व कॉल रेकॉर्डिंग जतन केले जातील.
०३. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर व सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाईल.
०४. ज्यांना माहित नाही अशा सर्वांना कळवा.
०५. आपले डिव्हाइस मंत्रालयीन सिस्टीमशी कनेक्ट होतील.
०६. कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नये याची खबरदारी घ्या.
०७. आपल्या मुलांना, भाऊ, नातेवाईक, मित्र, ओळखीच्या सर्वांना माहिती द्या की आपण त्यांची काळजी घ्यावी आणि क्वचितच सोशल साइट्स चालवा.
०८. राजकारणावर किंवा सद्यस्थितीबद्दल आपण सरकार किंवा पंतप्रधानांसमोर असलेले कोणतेही पोस्ट किंवा व्हिडिओ … इ. पाठवू नका.
०९. सध्या कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विषयावर संदेश लिहिणे किंवा पाठविणे हा गुन्हा आहे … असे केल्याने वॉरंटशिवाय अटक होऊ शकते.
१०. पोलिस अधिसूचना काढतील … त्यानंतर सायबर क्राइम … त्यानंतर कारवाई केली जाईल ते खूप गंभीर आहे.
११. कृपया तुम्ही सर्व, गट सदस्य, प्रशासक, … कृपया या विषयाचा विचार करा.
१२. चुकीचा संदेश पाठवू नका याची खबरदारी घ्या आणि सर्वांना माहिती द्या आणि या विषयाची काळजी घ्या.
१३. कृपया हे सामायिक करा.

गट अधिक जागरूक आणि सावध असले पाहिजेत.🙏

ग्रुप सदस्यांना व्हाॅट्सफ बद्दल महत्त्वाची माहिती…
👇👇👇


वाॅटसॲप वरील ब्लू टिक ✔ मधील चेंजेस आशा प्रकारे असतील


१. ✔= संदेश पाठविला
२. ✔✔= संदेश पोहचला
३. दोन निळ्या ✔✔= संदेश वाचला
४. तीन निळ्या ✔✔✔= शासनाने संदेशाची नोंद घेतली
५. दोन निळ्या व एक लाल ✔✔✔= शासन तुमच्या विरूध्द कारवाई करू शकते
६. एक निळी व दोन लाल = शासन तुमची माहिती तपासत आहे
७. तीन लाल ✔✔✔= शासनाने तुमच्या विरूध्द कारवाई सुरू केली असून लवकरच तुम्हाला न्यायालयाचे समन्स येईल.
जबाबदार नागरिक व्हा आणी तुमच्या मित्रांसोबत शेयर करा..
महत्त्वाचे म्हणजे पुढील ग्रुपमध्ये लवकर पाठवा…🙏🙏🙏🙏

तर मित्रानो हा message whatsapp वर वायरल होत आहे.

विश्वास न्यूज या न्यूज पोर्टल ने पोस्टमध्ये दिलेल्या क्रमांकावर कॉल करून आपली तपासणी सुरू केली. नाशिक पोलिस मुख्यालयातील मोहन गायकवाड यांच्या नावावर सामायिक केलेला नंबर बंद असल्याचे दिसून आले.

त्यांनी नाशिक पोलिसांच्या वेबसाइटवर शोध घेतला. मोहन गायकवाड नावाचा अधिकारी सापडला नाही. त्याचप्रमाणे यासंदर्भात प्रसिद्धी पत्रकासाठी वेबसाइट तपासली पण आम्हाला अशी कोणतीही सूचना मिळाली नाही.

विश्वास न्यूजने नाशिक शहर पोलिस आणि नाशिक ग्रामीण पोलिसांचे ट्विटर प्रोफाइलही तपासले, आम्हाला व्हायरल मेसेज सारखी माहिती कोठेही सापडली नाही.

या संदर्भात विश्वास न्यूजने पीआय सुभाष अनमुलवार, सायबर पोलिस स्टेशन, नाशिक ग्रामीणशी संपर्क साधला. विश्वास न्यूजशी बोलताना ते म्हणाले की हा संदेश त्यांच्याकडून देण्यात आलेला नाही. सामान्य लोकांकडून कॉल रेकॉर्ड करणे आणि त्या रेकॉर्डिंग सेव्ह करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर सायबर सेलचे एपीआय विशाल माने यांनीही हा व्हायरल मेसेज बनावट ( Fake Message ) असल्याचे सांगितले.

मित्रांनो तुम्ही सुद्धा अश्या खोट्या message वर विश्वास करू नका, कारण जेव्हा पण whatsapp चे नवे नियम लागू होतील, ते सरकार द्वारे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून कडवले जातील.

अश्या messages ला फॉरवर्ड करणे हे टाळा.

आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि पोस्ट पोहचवा

धन्यवाद ( 360Marathi.in )

Leave a Comment

close