रेमडेसिवीर साठी नोंदणी करा आता या संकेतस्थळावर

नाशिक प्रशासनाने रेमडेसिवीर ची मागणी आता ई-मेल द्वारे करण्याचे बंद केले आहे. वैद्यकीय आस्थापनांनी nashikmitra.in या वेबसाइट वर २७ एप्रिल पर्यंत नोंदणी करून रेमेडेसिवीर ची मागणी करायची आहे.

शासनाच्या वेबसाइट वर या बाबतची मागणीची नोंद घेणे बुधवार म्हणजेच 28 एप्रिल पासून बंद होणार आहे. रेमडेसीव्हर इंज्वेक्शन ची मागणी बाबत जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने खालील प्रमाणे दिली आहे.

आज नाशिक जिल्ह्याकरिता रेमडेसिव्हिर इंज्वेक्शन ची विगतवारी खालील प्रमाणे आहे.

क्र.विवरणसंख्या
1. आज दिनांक २५/४/२०२१ रोजिची सुरवातीची शिल्लक१३७
2.जिल्ह्याकरीता प्राप्त रेमडेसिव्हिर इंज्वेक्शन ३६७
3.जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे वाटपासाठी उपलब्ध रेमडेसिव्हिर इंज्वेक्शन ५०४
4.आज दि.२५/४/२०२१ रोजिची रेमडेसिव्हिर इंज्वेक्शन चे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अदेशानव्ये वाटप४३५
5.आज रोजिची शिल्लक६९

जिल्हाधिकारी कार्यालयास रेमडेसिव्हिर इंज्वेक्शन मागणी करिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या ईमेल आयडी वर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अस्थापना व्यतिरिक्त रुग्नांचे नातेवाईक देखील स्वतंत्र मागणी करीत आहेत. आणि या मुळे ईमेल प्रणालिवर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. सबब वाटप मध्ये सूसूत्रता आनन्या साठी दि. २७/४/२१ पर्यंत सर्व वैद्यकीय आस्थापनानी nashikmitra.in वेबसाइट वर जाउन आपल्या अस्थापणेची नोंदणी करून रेमडेसिव्हिर इंज्वेक्शन बाबत मागणी नोंदवावी. दि. २८/४/२१ पासुन ई- मेल द्वारे नोंदणी बंद होणार आहे कृपया याची सर्वानी नोंद घ्यावी.

Leave a Comment

close