Affiliate Marketing Meaning in Marathi | Affiliate Marketing बद्दल माहिती

नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Affiliate Marketing बद्दल जाणून घेणार आहोत. ऑनलाइन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे की जाहिरात करणे, सेवा देणे, काहीतरी विकणे इ. परंतु आज आपण ज्या पद्धतीबद्दल बोलणार आहोत ती सर्वात जास्त कमाई करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानली जाते. त्या पद्धतीचे नाव आहे Affiliate Marketing.

या पोस्टमध्ये, एफिलिएट मार्केटिंगबद्दल अगदी सोप्या शब्दात सांगितले आहे कारण आजच्या ऑनलाइन युगात, पैसे कमवण्यासाठी एफिलिएट मार्केटिंगमध्ये खूप संधी आहे. आता लोक सोशल मीडिया साइट्स वापरून एफिलिएट मार्केटिंगमधून चांगली कमाई करतात. त्यामुळे तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचलीच पाहिजे कारण त्यात सुरुवातीपासून अडव्हान्सपर्यंत एफिलिएट मार्केटिंगबद्दल सांगण्यात आले आहे.

तर चला सुरु करूया आणि पाहूया Affiliate Marketing बद्दल माहिती.

Affiliate Marketing म्हणजे काय

एफिलिएट मार्केटिंग ही मार्केटिंगची एक पद्धत आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती ब्लॉग किंवा youtube channel, सोशल मीडिया पेज, ई-मेल लिस्ट यांसारख्या स्त्रोतांद्वारे दुसर्‍या कंपनी किंवा संस्थेच्या उत्पादनांची जाहिरात किंवा शिफारस ( recommend ) करतो. त्या बदल्यात ती कंपनी किंवा संस्था त्या व्यक्तीला काही कमिशन देते. वेगवेगळ्या उत्पादनांनुसार वेगवेगळे कमिशन असते. हे कमिशन विक्रीची टक्केवारी किंवा विशिष्ट रक्कम देखील असू शकते.

एफिलिएट मार्केटिंग कसे कार्य करते ?

जी कंपनी किंवा संस्था आपल्या उत्पादनांचा प्रचार करू इच्छिते, ती आपला एफिलिएट प्रोग्रॅम ऑफर करते. आता इतर कोणतीही व्यक्ती जसे की ब्लॉग किंवा वेबसाइट मालक, किंवा सोशल मीडिया वर असणारे influencers, विविध मार्केटर्स त्या प्रोग्राममध्ये सामील होतात, तेव्हा कंपनी किंवा संस्था त्याला त्याच्या ब्लॉग. विडिओ किंवा पेजवर त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी कोणतेही बॅनर किंवा लिंक इ. देते.

आता पुढच्या टप्प्यात ती व्यक्ती ती लिंक किंवा बॅनर त्याच्या ब्लॉग. विडिओ किंवा पेजवर वेगवेगळ्या प्रकारे टाकते. आता बरेच युझर्स त्या व्यक्तीच्या ब्लॉग येतात त्याचे विडिओ पाहतात किंवा ई-मेल वाचतात.

जेव्हा एखादा व्यक्ती त्या लिंकवर किंवा बॅनरवर क्लिक करतो आणि affiliate प्रोग्राम ऑफर करणार्‍या कंपनी किंवा संस्थेच्या वेबसाइटवर पोहोचतो आणि काहीतरी खरेदी करतो किंवा एखाद्या सेवेसाठी साइन अप करतो, तेव्हा ती कंपनी किंवा संस्था त्याला त्या बदल्यात आपल्याला कमिशन देते. या प्रकारे affiliate marketing कार्य करते..

अनेक कंपन्या इंटरनेटवर Affiliate Marketing Programs चा प्रचार करतात. ज्यामध्ये Amazon, Flipkart, Hostgator, Bluehost ही मुख्य Affiliate Marketing उदाहरणे आहेत.

Affiliate Marketing द्वारे पैसे कसे कमवावे – how to earn money from affiliate marketing in marathi

आज अनेक लोक Affiliate Marketing द्वारे भरपूर पैसे कमावत आहेत.

अशा अनेक कंपन्या आहेत जिथे तुम्ही Affiliate Marketing मधून पैसे कमवू शकता जसे – Affiliate Marketing Flipkart, Affiliate Marketing Amazon, Godaddy, होस्टिंग च्या कंपन्या इत्यादी कंपन्या Affiliate Marketing उपलब्ध करतात.

एफिलिएट मार्केटिंगमधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला त्या वेबसाइट्सवर खाते तयार करावे लागेल, तिथे तुम्हाला पैसे कसे घ्यायचे आहेत ते निवडावे लागेल.

जसे तुमच्या बँक खात्यात किंवा Paypal वरून किंवा इतर कोणत्याही प्रकारे, अशा प्रकारे तुम्हाला तुमचे कमिशन तुमच्या निवडलेल्या मार्गाने मिळते.

अकाउंट बनवल्यानंतर कोणतेही प्रॉडक्ट निवडू शकतात आणि त्या संभंधित youtube, ब्लॉग किंवा सोशल मीडिया वर पोस्ट किंवा विडिओ बनवून टाकू शकतात..

त्यानंतर जेव्हा कुणीही तुमच्या लिंक वरून ते प्रॉडक्ट विकत घेईल तेव्हा तुम्हाला त्याबद्दल काही commission मिळेल, अश्या प्रकारे तुम्ही affiliate marketing करून ऑनलाईन पैसे कमवू शकतात.

भारतातील टॉप affiliate प्रोग्रॅम ?

Amazon
Jvzoo
Clickbank
Hosting Platforms
Shopify

निष्कर्ष –

आज या पोस्ट द्वारे आपण जाणून घेतली कि Affiliate Marketing म्हणजे काय ? Affiliate Marketing द्वारे ऑनलाईन पैसे कसे कमवावे..

जर तुम्हाला Affiliate Marketing काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की विचारा.

धन्यवाद

टीम ३६०मराठी

1 thought on “Affiliate Marketing Meaning in Marathi | Affiliate Marketing बद्दल माहिती”

Leave a Comment

close