Hacking म्हणजे काय ? Hacking Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, ३६०marathi या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे..

आज आपण हॅकिंग बद्दल संपूर्ण माहिती बघून घेणार आहोत जसे Hacking म्हणजे काय ? किती प्रकारे चे हॅकर्स असतात, हॅकिंग आणि एथिकल हॅकिंग मध्ये काय फरक आहे, आणि कश्या प्रकारे तुम्ही हॅकर्स पासून तुमच्या डेटा ला आणि तुमची privacy वाचवू शकतात..

चला तर मग जाणून घेऊया हॅकिंग बद्दल संपूर्ण माहिती.

Hacking म्हणजे काय ?

साध्या भाषेत सांगायला गेले तर, एखाद्या सिस्टिम ( जसे कॉम्पुटर, नेटवर्क, स्मार्टफोन ) मधील कमी शोधून विना परवानगीशिवाय ती माहिती मिळवणे यालाच हॅकिंग म्हणतात.  आणि जो व्यक्ती हे करतो त्याला हॅकर म्हटले जाते 

हॅकर हा एक असा व्यक्ती असतो ज्याला programming, algorithms, network, security बद्दल चांगली माहिती असते आणि त्याच माहिती चा  उपयोग तो हॅकिंग साठी करत असतो 

हॅकर्स चे प्रकार 

मित्रांनो काही हॅकर्स पण असतात चांगले तर काही वाईट,

आता आपण पाहूया किती प्रकार चे हॅकर्स असतात, आणि ते कश्या प्रकारे काम करतात..

1 ) Black Hat Hacker : 

हा Hacker चा एक प्रकार आहे, ब्लॅक हॅट हॅकर हि सायबर क्रिमिनल असतात, जे विना परवानगीशिवाय कोणत्याही कॉम्पुटर किंवा नेटवर्क मध्ये एंटर होतात आणि त्या सिस्टिम ला हानी पोहचवतात, 

त्यांचा उद्देश त्यामागे काहीही असू शकतो जसे त्या कॉम्पुटर मालकाला ब्लॅकमेल करून पैसे घेणे, किंवा जर नेटवर्क किंवा डेटा हॅक झाला असेल तर तो डेटा डार्क वेब वर विकून पैसे कमवणे 

2 ) White Hat Hacker : 

हे हॅकर्स Ethical Hacker असतात जे कॉम्पुटर किंवा नेटवर्क मध्ये कमतरता शोधण्यासाठी कॉम्पुटर मालकाकडून परवानगी घेऊन हॅकिंग करतात आणि जर त्यात काही अडचण असल्यास त्यांना सुरक्षित करतात 

मोठं-मोठ्या कंपन्या त्यांचा डेटा सुरक्षित करण्यासाठी अश्या हॅकर्स ला आपल्या कंपनीत कामाला लावत असतात.. 

3 ) Grey Hat Hacker : 

ग्रे हॅट हॅकर हा सुद्धा हॅकर्स चा एक प्रकार आहे, हे लोक व्हाईट हॅट हॅकर असतात, पण कधी कधी तर नियमाच्या विरुद्ध जाऊन कार्य करतात, पण त्यामागे त्यांचं हेतू वाईट नसतो 

Grey Hat Hacker यांना White Hat Hacker + Black Hat Hacker यांचं combination म्हणून ओळखतात 

4 ) Blue Hat Hacker : 

जेव्हा कंपनी आपला प्रॉडक्ट जसे वेबसाईट ,सॉफ्टवेअर,अँप लाँच करत असते, तेव्हा त्यात security मध्ये काही अडचण आहे का हे check करण्यासाठी ती कंपनी event करत असतात ज्यात Blue Hat Hacker यांना बोलवले जाते, 

आणि हे Blue Hat Hacker त्या सिस्टिम मधील security चेक करतात आणि काही अडचण असल्यास मार्गदर्शन करतात, आणि या साठी कंपनी त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे सुद्धा देते 

हे White hat hackers प्रमाणेच असतात..

5 ) Script Kiddie  : 

हे हॅकिंग Field मधील नवीन लोक असतात ज्यांना हॅकिंग बद्दल खूप कमी माहिती असते,

ते फक्त एक्स्पर्ट हॅकर ने बनवलेले सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅम वापरून हॅकिंग करत असतात.

तर मित्रांनो हे होते हॅकर चे काही प्रमुख प्रकार.

हॅकर्स पासून स्वतःला कस वाचवाल ?

 • एक चांगला Antivirus वापरा 
 • कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका 
 • मोबाइल किंवा कॉम्पुटर मध्ये pirated सॉफ्टवॅर किंवा अँप डाउनलोड करू नका 
 • स्पॅम वेबसाईट उघडू नका 
 • आपल्या फोन किंवा कॉम्पुटर ला नेहमी updated ठेवा 

तुमच्या मोबाईल साठी Best Antivirus

 • Kaspersky Mobile Antivirus
 • I-security
 • AVG Antivirus 
 • Avast Antivirus 
 • One Security 
 • Quick heal For Android 

निष्कर्ष

मित्रांनो आज आपण पाहिलं कि हॅकिंग म्हणजे काय ? हॅकर कोण असतो, हॅकर्स चे किती प्रकार असतात..

आशा करतो तुम्हाला हॅकिंग बद्दलची माहिती समजली असेल, जर तुम्हाला हॅकिंग बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर कंमेंट मध्ये विचारू शकतात 

धन्यवाद 

2 thoughts on “Hacking म्हणजे काय ? Hacking Information in Marathi”

Leave a Comment

close