Malware म्हणजे काय ? Malware Meaning & Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, ३६०marathi या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे..

आज या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत कि Malware म्हणजे काय ? malware कश्या प्रकारे तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाइल ला हानी पोहचवत असतो, 

malware कोण तयार करत आणि कश्या साठी तयार करतात त्यामागे त्यांचा हेतू काय असतो, malware चे किती प्रकार असतात आणि तुम्ही कश्या प्रकारे स्वतःला malware पासून वाचवू शकतात..

या सर्व गोष्टी आपण आज विस्तार मध्ये पाहणार आहोत, तर मग बघूया malware बद्दल माहिती..

Malware म्हणजे काय ?

मित्रांनो malware हा एक कॉम्पुटर प्रोग्रॅम असतो जो हॅकर्स ने तयार केलेला असतो, ज्याचा मागे त्याच काहीही उद्देश असू शकतो जसे तुमचं डेटा चोरी करणे, तुमच्या बँकेशी संभंधित माहिती घेणे किंवा इतर काही 

malware याला malicious प्रोग्रॅम सुद्धा म्हटले जाते कारण malware तुमच्या device मधील डेटा हॅकर पर्यंत सुद्धा पोहचवत असतो.. 

हॅकर्स कश्या प्रकारे तुमच्या device मध्ये malware पाठवता

malware ला victim च्या म्हणजे user च्या device पर्यंत पाठवण्यासाठी हॅकर्स खूप पर्याय वापरू शकतात जसे 

  • ई-मेल attachment 
  • स्पॅम मॅसेज द्वारे 
  • pirated सॉफ्टवेअर किंवा अँप द्वारे 
  • Pirated Movies & PDF 

किंवा बऱ्याचदा तुम्ही Ban वेबसाईट वापरत असतात त्याद्वारे सुद्धा malware तुमच्या device मध्ये डाउनलोड केला जातो.

हॅकर्स malware का तयार करतात ?

या मागे खूप कारण असू शकतात जसे 

  1. क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड ची माहिती मिळवणे 
  2. डेटा लीक करण्यासाठी 
  3. तुमच्या बद्दल इन्फॉर्मशन माहिती करण्यासाठी
  4. ब्लॅकमेल 
  5. पैसे कमवण्यासाठी 

अश्या खूप कारणांसाठी हॅकर malware तयार करत असतो..

malware चे किती प्रकार असतात ?

malware चे प्रकार खालीलप्रमाणे असतात.


1 ) Ransomware : ransomware हा malware चा एक प्रकार आहे, यात हॅकर हॅक झालेल्या device मालकांकडून पैसे मागत असतो आणि न दिल्यास तो त्यांच्या device मधील डेटा delete करतो

2 ) spyware : spyware हा virus लोकांवर नजर ठेवण्यासाठी वापरला जातो जसे ते कोणती वेबसाईट उघडतात किंवा ते त्यांच्या फोन मध्ये काय काय करतात इत्यादी.


3 ) Adware : Adware हा virus victim च्या device वर जाहिराती दाखवतो ज्यामुळे हॅकर ला पैसे मिळतात 

4 ) Trojan : या एखाद्या खऱ्या सॉफ्टवेअर किंवा अँप प्रमाणे दिसतो पण तस नाही, ट्रोजन तुमच्या device मध्ये येताच तो तुमच्या डेटा ला हानी पोहचवतो 


5 ) Worms : warms हा असा malware चा प्रकार आहे जो स्वतःच्या कॉपी बनवतो आणि तुमच्या device ला affect करतो 

6 ) Botnets : botnet म्हणजे हॅक झालेली device च collection असत जे हॅकर द्वारे तयार केले जाते, याचा उपयोग करून हॅकर DDoS अशे अटॅक करत असतो 

हे काही malware चे प्रमुख प्रकार असतात 

malware पासून कस सावध राहावं ?

  • एक चांगला antivirus वापरा 
  • कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका 
  • मोबाइल किंवा कॉम्पुटर मध्ये pirated सॉफ्टवॅर किंवा अँप डाउनलोड करू नका 
  • स्पॅम वेबसाईट उघडू नका 
  • आपल्या फोन किंवा कॉम्पुटर ला नेहमी updated ठेवा 

Malware पासून सुरक्षित राहण्यासाठी काही Best Antivirus सॉफ्टवेअर ( For Computer ) 

  • Malware bytes 
  • Avast Antivirus 
  • Avira Antivirus 
  • Kaspersky Antivirus 
  • Trend Micro Antivirus 
  • Bitdefender 
  • Nortan 
  • Quick Hell Pro 
  • Mc Afee 

malware पासून सुरक्षित राहण्यासाठी काही best antivirus Apps( For Android ) 

  • AVG Antivirus 
  • Avira For android 
  • Norton 360 For android 
  • Trend Micro For Android 

malware पासून सुरक्षित राहण्यासाठी काही best antivirus Apps( For iPhone) 

  • F-Secure 
  • Mc Afee
  • Lookout
  • Phone Guardian 

निष्कर्ष 

मित्रांनो आज आपण पाहिलं कि Malware म्हणजे काय ( Malware Meaning in Marathi ) Malware चे किती प्रकार असतात..

आशा करतो तुम्हाला Malware बद्दलची माहिती समजली असेल, जर तुम्हाला Malware Virus बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर कंमेंट मध्ये विचारू शकतात 

धन्यवाद ( ३६०Marathi.in )

4 thoughts on “Malware म्हणजे काय ? Malware Meaning & Information in Marathi”

  1. Khup chan mahiti aahe pan mayur patil siracha phone number dila asta tar tyachya drare thanchyshi sampark sadhata aala asta mayur patil yancha no. Mala pathava geli 2 varsh mobile malveir pasun me hiyran ahe

    Reply

Leave a Comment

close