How To Start A Blog in Marathi – स्वतःचा ब्लॉग कसा तयार करावा ? जर हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हि ब्लॉग पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा आणि १०० % तुमचे सगळे प्रश्न या एकाच पोस्ट मध्ये सुटतील.
नमस्कार मित्रांनो ३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज आपण Blogging विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला बेसिक पासून तर कश्या प्रकारे तुम्हे पैसे कमवाल यापर्यंत सगळी माहिती अगदी सोप्या शब्दात मांडली आहे..
बऱ्याच लोकांना ब्लॉग सुरु करायचा आहे पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये,
म्हणून आम्ही घेऊन आलोय हि पोस्ट ज्यात तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग कशी सुरु करावी? ब्लॉग लेखन कसे करावे, आणि अश्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळतील.
चला तर मग पाहूया,
ब्लॉग कसा तयार करावा ( How to start a blog in Marathi )
मित्रांनो थेट ब्लॉग कसा सुरु करायचा या आधी ब्लॉग म्हणजे काय आणि ब्लॉगिंग म्हणजे काय (Blogging In Marathi) हे समजून घेणं खूप महत्वाच आहे, कारण लोक फक्त earning proof बघून ब्लॉग सुरु करतात आणि त्यांना ३-४ महिने काही result मिळाला नाही कि मग ते ब्लॉग बंद करतात..
म्हणून आपण बेसिक पासून जाणून घेऊया …..
ब्लॉग म्हणजे काय? | What is Blog In Marathi
ब्लॉग सुद्धा एक वेबसाईट असते ज्यावर लेखक आपले विचार किंवा माहिती शेयर करत असतो जी गूगल किंवा सर्च इंजिन वर सर्च करून लोक वाचत असतात…
आणि जो व्यक्ती हा ब्लॉग तयार करतो त्याला ब्लॉगर म्हटले जाते म्हणजेच त्या ब्लॉग चा लेखक..
जसे ३६०marathi हा सुद्धा एक ब्लॉग आहे ज्यावर मी ब्लॉगिंग बद्दल आर्टिकल लिहलं आहे आणि तुम्ही ते वाचत आहात.
तसेच जर कोणी त्यांच्या ब्लॉग वर आरोग्य विषयी माहिती लिहीत असेल तर तो health ब्लॉग, technology विषयी माहिती लिहीत असेल तर tech ब्लॉग, अश्या प्रकार ब्लॉग असतात आणि त्यावर संभंधित विषयाची माहिती दिली जाते.
ब्लॉगिंग म्हणजे काय? | What Is Blogging In Marathi
मागच्या पॉईंट पाध्ये आपण पहिला कि ब्लॉग म्हणजे काय?, तर त्याचप्रमाणे एखाद्या ब्लॉग ला चालवणे म्हणजे त्यावर नवीन नवीन पोस्ट टाकणे, त्या ब्लॉग ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजेच ब्लॉगिंग होय..
आणि हे सर्व काम जो करतो त्याला ब्लॉगर म्हणतात, म्हणजेच ब्लॉगर एक असा व्यक्ती असतो जो ब्लॉग सुरु करून त्या ब्लॉग वर एखाद्या विषयाशी संभंधित आर्टिकल लिहतो आणि त्या ब्लॉग ला manage करतो..
सोप्या भाषेत सांगायला गेले तर जसे आम्ही, ३६०मराठी हा ब्लॉग सुरु करून त्यावर वेगवेगळ्या विषयांची माहिती देतो म्हणून ३६०मराठी हा एक ब्लॉग आहे, त्यावर माहिती लिहणारे आम्ही ब्लॉगर आहेत, आणि ३६०मराठी या ब्लॉग वर आम्ही माहिती लिहितो म्हणजेच आम्ही ब्लॉगिंग करतो किंवा ब्लॉग लेखन करतो.
आशा करतो या Example मधून तुम्हाला ब्लॉग, ब्लॉगिंग आणि ब्लॉगर बद्दल कल्पना आली असेल…
तर मित्रांनो हि होती काही ब्लॉगिंग विषयी बेसिक माहिती जी जाणून घेऊ महत्वाचं असत, म्हणजे आता तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल थोडी माहिती झाली आले जसे ब्लॉग काय असत, त्याला कोण बनवत आणि ब्लॉगिंग म्हणजे काय असत.
आता आपण पाहूया कश्या प्रकारे तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरु कराल ?
ब्लॉग कसा तयार करावा? How To Start A Blog In Marathi
मित्रांनो फक्त डोमेन आणि होस्टिंग घेऊन, ब्लॉग तयार करून त्यावर २-३ आर्टिकल टाकून चालत नसत, ब्लॉग सुरु करतांना खूप गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात म्हणजे तुम्हाला पुढे अडचण यायला नको…
जसे जर तुम्हाला एक ब्लॉग सुरु करायचा असेल तर तुम्हाला आधीच ठरवून घ्यावं लागेल कि त्यावर कोणते आर्टिकल तुम्ही टाकणार आहेत, कश्या प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लॉग चा SEO ( Search Engine Optimization ) करणार आहेत आणि अश्या बऱ्याच गोष्टी
तुम्ही जर ब्लॉग सुरु करण्याआधी या गोष्टी ठरवून घेतल्या तर बरेच..
नाहीतर मी माझ्या ब्लॉगिंग करियर मध्ये बऱ्याच लोकांना पाहिले आहे ज्यांनी health विषयी ब्लॉग सुरु केला होतो पण नंतर ते news, tech विषयी आर्टिकल लिहायला लागलेत, तर याच कारण आहे अपूर्ण प्लांनिंग
म्हणून तुम्ही हि चूक करू नका, आणि ब्लॉग सुरु करण्याआधी विषय निवडून घ्या
आता आपण पाहूया कश्या प्रकारे तुम्ही ब्लॉग साठी विषय ( Niche ) निवडू शकतात
ब्लॉग साठी विषय कसा निवडावा? | How to choose a niche For New Blog in Marathi
खाली तुम्हाला ४ मार्ग सांगितले आहेत ज्याद्वारे तुम्हाला ब्लॉगिंग साठी विषय किंवा टॉपिक निवडण्यास मदत होईल…
- तुमची आवड असलेला टॉपिक
- कमी competition असलेला टॉपिक
- जास्त search volume असलेला विषय
- जास्त कमाई होईल असा विषय
- तुमची आवड असलेला टॉपिक :
ज्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, म्हणजे ज्या विषयी तुम्हाला आवड असेल असा टॉपिक निवडू शकतात,
जसे समजा तुम्हाला आरोग्य विषयी चांगली माहिती आहे तर तुम्ही त्याविषयी ब्लॉग लिहू शकतात, वेगवेगळ्या आजरांबाबत माहिती देऊ शकतात, त्यावरचे उपाय, त्यासाठी घ्यावयाची काळजी अश्या अनेक टॉपिक वर तुम्ही आर्टिकल लिहू शकतात..
पण लक्षात घ्या, ज्या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्ट असेल, असं आवश्यक नाही कि लोकांना पण त्याच विषयात इंटरेस्ट असेल, समजा तुम्ही अश्या विषयावर ब्लॉग लिहत आहेत ज्याबद्दल लोक सर्च करत नाही तर त्यात तुमचा काहीच फायदा नसेल. म्हणून विषय निवडतांना तुमचं इंटरेस्ट आणि लोक त्याविषयी सर्च करतात का? या विषयी जाणून घ्या.
त्यासाठी तुम्ही कीवर्ड (कीवर्ड म्हणजे असा शब्द जो तुमचा टॉपिक दर्शवतो) रिसर्च करू शकतात, ज्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत,
म्हणून इंटरेस्ट + सर्च केला जाणारा कीवर्ड अश्या प्रकारे विषय ठरवा.
Example साठी सांगतो, जसे माझं शिक्षण Computer science आहे, म्हणून मला प्रोग्रामिंग, हॅकिंग, technology बद्दल माहिती आहे म्हणून मी या ब्लॉग वर त्याविषयी आर्टिकल लिहतो आणि लोक या विषयी सर्च सुद्धा करतात, म्हणून माझ्यासाठी असे विषय उत्तम आहे
अश्याप्रकारे तुमच्यात काय विशेष आहे आणि तुम्हाला कश्यात जास्त माहिती आहे हे ठरवा आणि त्याबद्दल लिहायला सुरु करा..
2. कमी competition असलेला टॉपिक :
जर तुम्ही कमी competition म्हणजे असलेलं टॉपिक वर पोस्ट लिहली तर ती सर्च इंजिन मध्ये लवकर रँक होते आणि तुमच्या ब्लॉग वर ट्रॅफिक ( वाचणारे लोक ) पण लवकर येतात
कमी competition असणारे विषय शोधण्यासाठी तुम्ही keyword research करू शकतात ज्याबद्दल आपण पुढे माहिती पाहू..
3. जास्त search volume असलेला विषय किंवा ट्रेंडिंग विषय :
जर तुम्ही ट्रेंडिंग विषयावर आर्टिकल लिहले तर ते वायरल होण्याचेही चान्स असतात, कारण अशे विषयाची आर्टिकल लोक सोशल मीडिया वर देखील शेयर करतात….
म्हणून तुम्ही ट्रेंडिंग विषयावर देखील आर्टिकल लिहू शकतात e.g. News, नवीन movies, काही घटना..
4. जास्त कमाई होईल असा विषय :
जास्त कमाई साठी खालील विषय उत्तम आहेत –
- Technology
- Health
- Beauty
- Fitness
- Jobs & Career
- Smartphones, Reviews
- Gadgets
अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लॉग साठी विषय निवडू शकतात.
एकदा विषय निवडला मग सुरुवात होईल ब्लॉग सेटअप.
ब्लॉगिंग साठी कोणता प्लॅटफॉर्म निवडावा? | Which Is The Best Platform For Blogging In Marathi
ब्लॉग सुरु करण्यासाठी तुमच्याकडे २ पर्याय असतात WordPress आणि ब्लॉगर.
आता आपण पाहूया तुमच्या बजेट नुसार तुम्हाला कोणता प्लॅटफॉर्म योग्य असेल..
WordPress :
वर्डप्रेस एक प्रोफेशनल सॉफ्टवेअर आहे जे ब्लॉगिंग साठी वापरलं जात.
वर्डप्रेस वर ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग ची गरज असते.
म्हणून जर तुमचा बजेट १००० तर ३००० हजार रुपये दरम्यान असेल तर तुम्ही वर्डप्रेस वर ब्लॉग सुरु करू शकतात.
हे पण वाचा :
Blogger.com :
blogger.com हा गूगल द्वारे चालवला जातो आणि हा फ्री प्लॅटफॉर्म आहे, यावर तुम्ही अगदी मोफत ब्लॉग सुरु करू शकतात ज्यात तुम्हाला सबडोमेन मिळतो जसे abc.blogspot.com ( इथे abc च्या ठिकाणी तुमच्या ब्लॉग च नाव असेल )
आणि जर तुम्हाला स्वतःचा डोमेन घ्याचा असेल तर तुम्ही godaddy वर तो घेऊन कनेक्ट करू शकतात जसे आम्ही केला आहे ३६०marathi.in
थोडक्यात तुम्ही ब्लॉगर वर अगदी मोफत सुद्धा आणि स्वतःचा डोमेन पाहिजे असल्यास ४००-५०० रुपयात डोमेन घेऊ ब्लॉग सुरु करू शकतात..
वर्डप्रेस आणि ब्लॉगर यात फरक काय? (WordPress Vs Blogger in Marathi)
कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल कि जर ब्लॉगर वर आपण फ्री मध्ये सुद्धा ब्लॉग सुरु करू शकतो तो वर्डप्रेस ची काय गरज, एवढे १०००-३००० रुपये कशाला?
तर मित्रांनो याच कारण आहे कि वर्डप्रेस तुम्हाला जास्त ऑपशन मिळतात जसे plugin, खूप साऱ्या थिम ( ब्लॉगर वर सुद्धा मिळतात ) आणि तुम्ही तुम्हाला हवं तशी डिजाईन तुमच्या ब्लॉग ला देऊ शकतात, पण ब्लॉगर मध्ये या साठी काही लिमिट असत..
म्हणून जास्त लोक वर्डप्रेस वापरतात.
पण लक्षात घ्या तुम्ही जर ब्लॉगिंग क्षेत्रात नवे असाल तर आम्ही तुम्हाला सल्ला देतो कि ब्लॉगर वर सुरु करा आणि आधी थोडी प्रॅक्टिस करा, याबद्दल अजून काही माहिती जाणून घ्या.
Domain आणि Hosting :
एकदा तुम्ही ठरवलं कि कोणत्या प्लॅटफॉर्म वे ब्लॉग सुरु करायचा आहे, मग तुमहाला गरज असेल डोमेन आणि होस्टिंग ची.
तुम्ही जर Blogger.com वर सुरु करत असणार तुम्हाला Hosting ची गरज नसणार, फक्त डोमेन हि तुम्ही घेऊ शकतात किंवा त्याशिवाय हि सुरु करू शकतात
पण जर तुम्हाला वर्डप्रेस वर ब्लॉग सुरु करायचा असेल तर तुम्हाला Domain आणि Hosting लागेल
Domain कुठून घ्याल ?
- Godaddy
- NameCheap
- BigRock
- Google Domains
Hosting कुठून घ्याल ?
- Hostinger
- Bluehost
- A२Hosting
- Greengeeks
- Godaddya
- Hostgator
इथून तुम्ही होस्टिंग घेऊ शकतात…
टीप – मित्रांनॊ बऱ्याच कंपन्या तुम्हाला होस्टिंग सोबत डोमेन फ्री देतात, म्हणून तुम्हाला डोमेन घ्यावा लागत नाही.
Domain & Hosting साठी किती पैसे लागतात ?
जर तुम्ही फक्त डोमेन घेऊ blogger.com वर ब्लॉग सुरु करत असणार तर तुम्हाला ४००-१००० दरम्यान चांगला डोमेन जसे .कॉम .इन मिळून जातो
पण तुम्हाला वर्डप्रेस वर करायचं असेल तर तुम्हाला १००० रुपये तर ३००० दरम्यान खर्च येऊ शकतो, हे तुमच्या अवलंबून असेल कि तुम्ही कोणता प्लॅन घेतात…
त्यांनतर गोष्ट येते डोमेन आणि होस्टिंग सेटअप ची, तर मित्रांनो ते इथे सांगणं जरा कठीण आहे कारण, प्रत्येक कंपनी चा डॅशबोर्ड वेगळा असत म्हणून प्रत्येक कंपनी साठी वेगळ्या पद्धतीने सेटअप करावं लागत
पण घाबरू नका.. YouTube वर जा आणि जिथून डोमेन होस्टिंग घेतली आहे ( जसे Hostinger ) त्याच नाव टाका जसे Hostinger WordPress install खूप विडिओ येतील ते बघून तुम्ही अगदी १० मिनटात सेटअप करू शकतात,
त्याच प्रमाणे blogger.com वर सुरु करायचा असल्यास तुम्ही खालील विडिओ पाहू शकतात
अश्या प्रकारे तुम्ही ब्लॉग सेटअप करू शकाल वर्डप्रेस आणि ब्लॉगर वर
आता गोष्टी येते सेटअप नंतर काय ?
तर आता तुम्हाला आर्टिकल लिहावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला keyword शोधावे लागतील म्हणजे keyword research करावं लागेल ते कस कराल चला पाहूया..
keyword research कशी करावी? | How to do Keyword Research in Marathi
कीवर्ड रिसर्च करण्यासाठी तुम्ही खालील सॉफ्टवेअर वापरू शकतात..
- Ahref ( Paid )
- Ubersuggest ( Paid )
- Answer The Public ( Free )
- Semrush ( Paid )
- Google Keyword Planner Tool ( Free )
- Google Trend ( Free )
गूगल Auto Suggest :
जेव्हा तुम्ही गूगल वर काही सर्च करतात तेव्हा खाली Related Searches असं ऑपशन येतो त्यात जे कीवर्ड असतात, त्या वर सुद्धा तुम्ही आर्टिकल लिहू शकतात..
Keyword Everywhere Extension :
Keyword Everywhere हे एक गुगल chrome एक्स्टेंशन आहे, ज्यात संबंधीत कीवर्ड किती लोक सर्च करतात आणि त्याला cpc किती आहे ते दाखवत
तुम्ही खाली फोटो मध्ये पाहू शकतात..
याच्याने सुद्धा तुम्हाला बरेच कीवर्ड मिळू शकतात..
जर तुम्हाला keyword research बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर हा विडिओ नक्की पहा..
पोस्ट आणि पेज :
कीवर्ड रिसर्च झालं का मग पुढची स्टेप असत आर्टिकल लिहण्याची..
आर्टिकल लिहताना यो गोष्टी फॉलो करा..
- कमीत कमी ५००-1000 word ( For Information, Health Niche, Not For News etc) चा आर्टिकल लिहा
- तुमचं आर्टिकल वाचल्यानंतर visitor चा प्रश्न सुटेल, म्हणजे ज्या प्रश्नासाठी किंवा माहिती साठी त्याने सर्च केलं होत त्याच उत्तर त्याला मिळायला हवं, नाहीतर visitor दुसऱ्या वेबसाईट वर उत्तम शोधेल ज्यामुळे तुमच्या वेबसाईट चा Bounce Rate वाढतो..
- पोस्ट मध्ये keyword placement नीट करा, प्रत्येक ठिकाणी keyword वापरू नका म्हणजे keyword stuffing करू नका यामुळे सर्च इंजिन ला चुकीचा सिग्नल जातो
- जास्तीत जास्त इमेजेस वापरा
- गरज असेल तर विडिओ सुद्धा एम्बेड करा
- On Page SEO वर लक्ष ठेवा
- Heading वापरा H1, H2, H3, H4
- लहान लहान पॅराग्राफ करा यात वाचण्यास अडचण येत नाही
पेज : ब्लॉग साठी काही पेज बनवणं आवश्यक असत जसे about us , contact us , privacy policy, terms & condition..
तुम्ही हे Pages खालील वेबसाईट वर बनवू शकतात
- About us ( स्वतः तयार करा, तुमच्याबद्दल माहिती किंवा ब्लॉग बद्दल माहिती )
- Contact Us ( वर्डप्रेस मध्ये plugin द्वारे बनवा आणि ब्लॉगर मध्ये सुद्धा स्वतः बनवू शकतात )
- terms and conditions
- disclaimer
- privacy policy
Search engine submission करणे :
मागील सगळ्या स्टेप पूर्ण केल्या नंतर मग तुम्हाला सर्च इंजिन मध्ये तुमची वेबसाईट सबमिट करावी लागेल ज्यामुळे तुमची वेबसाईट इंडेक्स होईल म्हणजे गूगल मध्ये दिसायला लागेल…
खालील काही सर्च इंजिन मध्ये तुम्ही तुमची वेबसाईट सबमिट करू शकतात
- Bing
- Yahoo
- Yandex
यात वेबसाईट व्हेरिफाय करून साइटमॅप सबमिट करा यामुळे तुमचे वेबसाईट इंडेक्स होईल..
ब्लॉग वर ट्रॅफिक कस आणावं ?
ब्लॉग वर ट्रॅफिक आणण्यासाठी तुम्ही खूप पर्याय वापरू शकतात जसे
SEO : जर तुम्हाला गूगल मधून orgnic traffic हवं असेल तर तुम्हाला तुमच्या ब्लॉग चा SEO करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला orgnic ट्रॅफिक मिळू शकते .
शिका एसईओ (SEO) सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? | What is SEO in Marathi?
सोशल मीडिया : सोशल मीडिया वर ट्रॅफिक साठी तुम्ही तुमच्या फेसबुक ग्रुप, फेसबुक पेज, टेलिग्राम चॅनेल किंवा ग्रुप, वव्हाट्सअँप ग्रुप वर तुमच्या ब्लॉग च्या लिंक शेयर करू शकतात…
Email List : तुमच्या ब्लॉग वर येणाऱ्या visitor चे ई-मेल घेऊ त्यांना नव्या आर्टिकल चे लिंक तुम्ही पाठवू शकतात..
ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे ?
आता या शेवटच्या टॉपिक मध्ये आपण पाहूया कि ब्लॉगिंग मधून पैसे कशे कमवायचे..
Affiliate Marketing :
affiliate marketing हा उत्तम पर्याय आहे Blog वरून पैसे कमवण्यासाठी,
जर तुम्हाला affiliate marketing बद्दल माहिती नसेल तर थोडक्यात सांगतो
समजा एक कंपनी आहे आणि त्यांना त्यांचं प्रॉडक्ट प्रमोट करायचं आहे, तर ते affiliate प्रोग्रॅम चालवतात, जो तुम्ही जॉईन करू शकतात, आणि त्यानंतर प्रत्येकाला एक unique लिंक मिळते, आणि जेव्हा कोणी तुमच्या लिंक वरून त्या कंपनी च प्रॉडक्ट विकत घेईल तेव्हा तुम्हाला कमिशन मिळेल
आता या द्वारे पैसे कशे कमवाल ?
समजा तुमचं fitness ची related Blog आहे, ज्यावर तुम्ही Fitness Tips चे, Blogs टाकतात,
आता साहजिकच आहे कि तुमचे Visitors ला फिटनेस मध्ये आवड आहे म्हणून तर त्यांनी blog ला Visit केलय
तर तुम्ही त्यांना ऍमेझॉन फ्लिपकार्ट या सारख्या कंपनी च affiliate प्रोग्रॅम जॉईन करून त्यांना फिटनेस शी related प्रॉडक्ट जसे प्रोटीन वगरे प्रमोट करू शकतात, आणि जो तुमच्या लिंक वरून ते प्रोटीन विकत घेईल त्यात तुम्हाला काही टक्के कमिशन मिळेल, ( विकत घेणाऱ्याला extra पैसे द्वावे लागत नाही )
अश्या प्रकारे तुम्ही Blog वरून affiliate मार्केटिंग वापरून पैसे कमवू शकतात
Advertisement ( Google Adsense ) :
ब्लॉग हा कुठल्याही भाषेत बनविला जाउ शकतो त्याला बंधन नाही फक्त Audience समझुन घेऊन ब्लॉग बनविला पाहिजे. जसे तुम्ही मराठीत blogging शिकत आहात तसेच Blogging in Hindi, इंग्रजी मोठ्या प्रमाणावर इंटरनेट वर पाहू शकता. या 3 भाषेत ब्लॉगिंग सर्वात जास्त होते आणि ही सर्व गूगल एडसेंस कढून पैसे कमविन्यासाठी पात्र पण आहेत।
गूगल ऍडसेन्स Earning साठी सर्वात जास्त वापरला जाणारा मार्ग आहे, साधारणतः Blog वर १००० views वर ७०-१००० रुपये भेटू शकतात, आणि हे तुम्ही कोणत्या टॉपिक वर Blog लिहतात, आणि तुमचे Blog कोण पाहत,
जसे USA मधील लोक पाहत असतील तर earning जास्त होईल आणि आपला देशातील लोक पाहतील तर earning थोडी कमी होईल..
अश्या प्रकारे तुम्ही ब्लॉग द्वारे पैसे कमवू शकतात…
FAQ About Blogging In Marathi
ब्लॉग म्हणजे काय ?
ब्लॉग सुद्धा एक वेबसाईट असते ज्यावर लेखक आपले विचार किंवा माहिती शेयर करत असतो जी गूगल किंवा सर्च इंजिन वर सर्च करून लोक वाचत असतात…
ब्लॉग लेखन म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायला गेले तर जसे आम्ही, ३६०मराठी हा ब्लॉग सुरु करून त्यावर वेगवेगळ्या विषयांची माहिती देतो म्हणून ३६०मराठी हा एक ब्लॉग आहे, त्यावर माहिती लिहणारे आम्ही ब्लॉगर आहेत, आणि ३६०मराठी या ब्लॉग वर आम्ही माहिती लिहितो म्हणजेच आम्ही ब्लॉगिंग करतो किंवा ब्लॉग लेखन करतो.
सविस्तर ब्लॉग म्हणजे काय?
हे बघा, ब्लॉग २ प्रकारचे असू शकतात छोटे किंवा अगदी मोठे. आता छोटे ब्लॉग्स म्हणजे अगदी थोडक्यात माहिती असलेला ब्लॉग किंवा ब्लॉग पोस्ट. आणि सविस्तर ब्लॉग म्हणजे एखादा विषय अगदी A पासून Z पर्यंत सखोल समजावून सांगितलेली माहिती असलेला ब्लॉग.
(तुम्ही फक्त एकच विषयावर सुद्धा सविस्तर पूर्ण ब्लॉग बनवू शकतात जसे कि फक्त शेती, व्यवसाय, शिक्षण इ. ज्याला आपण मायक्रो ब्लॉग सुद्धा म्हणतो)
ब्लॉग चे प्रकार किती
ब्लॉग चे २ प्रकार आहेत,
पर्सनल ब्लॉग (Personal Blog)
प्रोफेशनल ब्लॉग (Professinal Blog)
ब्लॉग तयार करण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे
ब्लॉग तयार करण्यासाठी
१. सम्बंधित विषयात तुम्ही तरबेज असायला पाहिजे.
२. लिहिण्याची आणि एखादा विषय समजून सांगण्याची कला तुम्हाला जोपासली पाहिजे.
३. ब्लॉग साठी विषय निवडताना आम्ही वर सांगितलेल्या गोष्टी लक्षात असू द्या.
४. वर्डप्रेस वर ब्लॉग सुरु करत असाल तर होस्टिंग उत्तम आहे याची खात्री करून घ्या.
ब्लॉग लिहिताना कोणती काळजी घ्यावी?
ब्लॉग लिहिताना कोणती काळजी घ्यावी
१. कोणत्याही विषयाचा ब्लॉग लिहीत असताना आपण सर्वात आधी त्या विषयाचा सखोल अभ्यास करून घ्यावा आणि मगच लिहायला सुरवात करावी.
२. तुमचा ब्लॉग वाचून कोणाला तरी फायदा किंवा नुकसान होऊ शकते हि गोष्ट डोक्यात घेऊनच ब्लॉग लेखन करावे.
३. विषय सविस्तर समजून सांगावा, जेणेकरून वाचकाला नन्तर कोणतीही शंका असू नये.
४. माहिती पुरवताना आपण माहिती कुठून घेतली आहे अशा प्रत्येक गोष्टीचा refference तुम्ही दिला पाहिजे.
निष्कर्ष :
आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की ब्लॉग कसा तयार करावा | How To Start A Blog in Marathi
आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा, आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या.
धन्यवाद…
खूपच छान🙏
Thank You, Vijay !!!
खुपचं छान माहीती दिली आहे. धन्यवाद …
Thank You, Komal!!! अजून काही माहिती हवी असल्यास कळवा आम्ही ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करू.
Very nice informative blog writing dada 👌🏻👌🏻
Thank You Aakash 😊
छान माहिती सर
ब्लॉग पोस्ट रँक कशी करावी?
Nice information
Sir mi blog tyar kela ahe post pn lihali ahe pn ti share ch hot nahi mi Navin ahe mala gaidens kara please
नमस्कार, बघा ब्लॉग म्हणजे लोकांना काहीतरी मदत होईल यासाठी लिहिलेला लेख, तुम्ही जर अगदी नवीन असाल तर थोडं details technical ज्ञान घ्या जे youtube वर फ्री मध्ये मिळेल. दुसरं असं कि तुम्ही जे लिहिताय ते लोकांना फायदा होईल असं असेल तर नक्कीच शेअर होईल आणि उत्तम प्रतिसाद तुम्हाला मिळेल. बाकी आम्ही पोस्ट मध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी तुम्ही follow केल्या तर नक्कीच तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये यश येईल, धन्यवाद
मला तुमचा हा ब्लॉग खूपच आवडलेला आहे. तुम्ही एकदम मस्त सविस्तर माहिती प्रधान केलेली आहे.
पण मला असं वाटत आहे कि तुम्ही कोणत्या भाषेत ब्लॉगिंग करावं यावर एखादा टॉपिक ऍड केला असता तर थोडी अजून 1% मदत झाली असती. मी गोंधळलेलो आहे कि ब्लॉग मराठी मधून लिहावे कि इंग्रजी मधून लिहावे कि हिंदी मधून लिहावे कारण जास्तीत जास्त ट्रॅफिक कोणत्या भाषेच्या ब्लॉग वर येते हे समजलेलं नाही.
कृपया तुम्ही मला मार्गदर्शन करावे.
Khupch Chan information
Thank You Jyoti
खूप छान माहिती सांगितली
Thank uhh for information 👍 really helpful
Thanks Sanika…
Nice information