फक्त २ दिवसात उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढावा | Income Proof Certificate PDF Online Maharashtra

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही घर बसल्या उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढावा याबद्दल माहिती दिली आहे, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणते याबद्दल देखील सांगितले आहे, तर चला सुरु करूया आणि पाहूया कि उत्पन्न दाखला म्हणजे Income Proof Certificate कसा काढावा.

उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन कसा काढावा – Income Proof Certificate Online

सर्वात आधी उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन काढण्यासाठी तुम्हाला www.aaplaesrakar.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे वेबसाईट वर मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडण्याचा पर्याय आहे. त्यापैकी एक भाषा निवडा.

ज्याच्या नावाने उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे त्याच्या नावाने नोंदणी करावी लागेल; तिथे आपला जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर OTP द्वारे आपला मोबाइल नंबर पडताळावा लागेल .

पुढे एक युजरनेम बनवून पासवर्ड तयार करावा व त्यानंतर पुढे नाव आणि जन्मतारीख टाकून अकाउंट तयार करावे, तसेच आधारकार्ड वरील नाव देखील टाकावे.

अश्या प्रकारे तुमचं अकाउंट तयार झाल्याचा संदेश प्राप्त होईल. त्यानंतर लॉगिन करा..

लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला सर्वात खाली महसूल विभाग असे आहे . महसूल विभाग निवडल्यानंतर उपविभाग मध्ये महसूल सेवा निवडावे, तिथे सर्वात खाली उत्पन्नाचा दाखला (Proof Of Income) असा पर्याय आहे, तो निवडा, पुढे proceed बटनावर वर क्लिक करा . पुढे उत्पन्नाचा दाखला असा पर्याय निवडावा तिथे तुम्हाला खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल,

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात –

ओळख पुरावा

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र पैकी कोणतेही एक

पत्त्याचा पुरावा –

  • पासपोर्ट
  • रेशन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • वीज बिल
  • वाहन चालवण्याचा परवाना

जर तुमचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर

  • जन्माचा दाखला
  • बोनाफाईड प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला 15 दिवसात तहसीलदारमार्फत मिळतो, पण आता ऑनलाईन तुम्हाला २-३ दिवसात देखील मिळतो . उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तूम्हाला उत्पन्न वर्ष निवडावे लागेल जसे कि 1 वर्ष चा किंवा 3 वर्षचा.

अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा व नंतर आपला व्यवसाय निवडा. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकावा.

खाली I agree वर क्लिक करा.

यानंतर आपलेसरकार या वेबसाईट वर खालील document अपलोड करावे लागतील –

  • अर्जदाराचा फोटो
  • ओळखीचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • उत्पनाचा पुरावा
  • तलाठी प्रमाणपत्र
  • स्वघोषणापत्र.

documents अपलोड केल्यानंतर तुम्हाला याची फी ३4 रुपये द्यावी लागेल, हि फी तुम्ही upi, netbanking, डेबिट कार्ड द्वारे देऊ शकतात.

त्यांनतर तुम्हाला successful चा message येईल.

अश्या प्रकारे तुम्ही उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन काढू शकतात.

त्यांनतर २-३ दिवसात पुन्हा लॉगिन करून तुम्ही उत्पन्नाचा दाखला pdf डाउनलोड करू शकतात.

निष्कर्ष :

आशा करतो तुम्हाला उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन कसा काढावा याचे उत्तर मिळालेच असेल, जर अजून देखील समजले नसेल तर खालील विडिओ तुम्ही पाहू शकतात..

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close