स्वातंत्र्य दिनानिमित्त ३ उत्कृष्ट कविता | Independence Day Kavita in Marathi | Independence Day Poem in Marathi

आज स्वातंत्र्य दिवस निम्मित काही मराठी कविता शेयर करतोय आणि आशा करतो कि तुम्हाला नक्की आवडतील

Independence Day Kavita in Marathi

किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला

तरुणान्नि तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले

आइने मुलाचे दान दिले
विवहितेने सौभाग्य पनाला लावले
तरुणिन्निही शस्त्र धारण केले
देशलाच आपला दागिना मानले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले.
स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा

Writer – archana sonagre

Independence Day Poem in Marathi 2

स्वातंत्र्याचा सोहळा जरी 
झाला आता जुना 
आज माझ्या मनी जागली 
देशभक्तीची भावना

सणांचे रूप आले होते 
साऱ्या त्या शाळांना 
ऐकत होते चिमुरडे सारे 
कौतुकाने त्या भाषणांना

देशभक्तीची जाण भारी 
छोट्या त्या चिमुकल्यांना 
मी ही भरला आवाज 
अन् साथ दिली घोषणांना

आज माझ्या मनी जागली 
देशभक्तीची भावना

आज चाळलं मनाने 
इतिहासाच्या पानांना 
नव्याने आठवलं मी 
त्या महान बलिदानांना

शौर्याच्या कथा साऱ्या
दिसू लागल्या डोळ्यांना 
पुन्हा जाणवल्या लढ्याच्या 
त्या साऱ्या खूणा

आज माझ्या मनी जागली 
देशभक्तीची भावना

आज पुन्हा गुणगुणली
देशप्रेमाची गाणी 
आठवली आज मला 
क्रांतीची ती कहाणी

झेंड्याला वंदन करून 
गर्व झाला श्वासांना 
छातीत भरून घेतलं मी
देशभक्तीच्या साऱ्या भावनांना

Subhash Katakdound 

Independence Day Poem in Marathi 3

बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥

हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥

वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥

हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥

करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥

या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥

ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥

youtube.com

Also Read :

Team 360Marathi.in

Leave a Comment

close