Kargil Vijay Diwas Poem in Marathi | कारगिल विजय दिवस कविता मराठी

Kargil Vijay Diwas Poem in Marathi : नमस्कार आज या पोस्ट मध्ये कारगिल विजय दिवस निम्मित काही कविता शेयर केल्या आहेत, ज्या तुम्हाला नक्की आवडतील.

Kargil Vijay Diwas Poem in Marathi

कसा हवा भारत देश :

जिथे सगळ्यांची जात ही भारतीय असेल
धर्म देशप्रेम उच्च नीच भेद भाव सीमा पार असेल नातं असेल
भारतीयत्वाच सुख शांती समाधान मिळेल
शत्रूचा थरकाप उडवील एवढी विचारांना धार असेल
प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल
जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयी आदर असेल

– abhijit hajare
Kargil Vijay Diwas Poem in Marathi

कारगिल विजय दिवस कविता मराठी

घडतोय बदल
चढतेय वीटेवर वीट
मिटतेय गुलामी
आपण होतोय धीट
उठत आहेत प्रश्न
कुरवाळतोय शंका
अन्यायाविरुद्ध
कुणी वाजवतोय डंका
पसरतेय महिती
हक्कासाठी भांडतोय
उलट सुलट का होईनात
आपण विचार मांडतोय
घडवितोय देश आपला
अंतराळी इतिहास
उद्याच्या चैतन्यावर
दृढ होतोय विश्वास
कोपर्‍यातल्या झोपडीमध्ये
प्रगतीची इच्छा दिसतेय
पुस्तकाच्या बाजारातही
आशेची पालवी रुजतेय
भारतीय असण्याचा वाटे
मनापासून अभिमान
बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र
माझा भारत देश महान
youtube.com

आशा करतो या कारगिल दिवस साठी कविता किंवा देशभक्ती मराठी कविता तुम्हाला आवडल्या असतील

आवडल्या तर शेयर नक्की करा

आमच्या इतर पोस्ट्स

धन्यवाद

Leave a Comment

close