(12Points) Mucormycosis in Marathi | Symptoms Remedies Treatment & Precautions | Mucormycosis & Corona in Marathi|

Topics

Mucormycosis in Marathi symptoms remedies – राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका असताना आता कोरोनामुक्त झालेल्यांना गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. मधुमेहाचा (Diabetes) त्रास होत असलेल्या व्यक्तींना विशेषतः म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे. जरी त्याची प्रकरणे कमी आहेत, परंतु हा एक अत्यंत धोकादायक आजार आहे. Fungal infection after covid recovery | Mucormycosis Symptoms, Precautions and remedies.

पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक आणि अजून बऱ्याच शहरांमध्ये म्युकरमायकोसिस (Mucormycosis) चे रुग्ण सापडले आहेत. यात मधुमेह असलेले कोरोना बाधित रुग्ण जास्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापश्चात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) चा त्रास जाणवतो आहे.

या आजारामुळे डोळ्यांमध्ये बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection)होतो. जर संसर्ग वाढला तर द्रीष्टी जाण्याचा देखील धोका आहे. इतकेच नव्हे तर ही बाब जशी गंभीर होते तशी ही बुरशीजन्य संसर्ग म्हणजेच फंगल इन्फेकशन मेंदूतही पसरू लागतो.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय? | Mucormycosis Mhanje Kay? | Mucormycosis in Marathi Symptoms remedies

म्यूकोर्मिकोसिस हा एक म्युकर मायोसिटिस नावाचा समूह आहे. ज्याला आपण ब्लॅक फंगस सुद्धा म्हणतो. हा एक प्रकारचा Fungal Infection आहे जो शरीरात खूप वेगाने पसरतो. याला झिगॉमायकोसिस देखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. मेंदू, फुफ्फुस किंवा त्वचेवर याचे संक्रमण होऊ शकते. या रोगामध्ये, बर्याच रुग्णांच्या जबडा आणि नाकाची हाड गळून जातात, आणि काहींच्या डोळ्यांचा प्रकाश सुद्धा कायमचा निघून जातो. जर वेळीच त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर ते रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते.

म्युकरमायकोसिस इन्फेक्शन हा काही नवीन रोग नाही. पण कोरोनाच्या अनुपस्थितीत पूर्ण देशभरात दरवर्षी साधारण फक्त एक ते दोन प्रकरणे बघायला मिळायची. पण एवढ्यात, पहिली कोरोना या आजाराचे फारसे रुग्ण दिसत नव्हते, परंतु दुसर्‍या लाटेत फारच आश्चर्यकारक आणि धक्कादायक प्रमाणात दिसून येत आहेत. हा फरक दोन लहरींमध्ये दिसून आला आहे.

म्युकरमायकोसिसचा कोरोनाच्या रुग्णांना जास्त धोका

(Mucormycosis) म्यूकोरामायसिस रोग सहसा त्या लोकांना लवकर होतो ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. आणि कोरोना दरम्यान किंवा नंतर बरे झालेल्या रूग्णांची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमकुवत असते, म्हणूनच ते त्यामध्ये सहजपणे पकडले जाताय. विशेषत: कोरोना रूग्णांमध्ये ज्यांना मधुमेह आहे, आणि त्यातही ज्यांची शुगर लेव्हल म्हणजेच साखरेची पातळी अनियमित किंवा जास्त असेल त्यांच्यामध्ये म्यूकोर्मिकोसिस धोकादायक ठरू शकते.

म्युकरमायकोसिस चा जास्त धोका फक्त डायबेटीस असणाऱ्या कोरोना रुग्णालाच का आहे? | Mucormycosis Cha Jast Dhoka Fakt Diabetes Patient Lach ka ahe?

बरेच लोकांच्या मनात प्रश्न आहे कि मधुमेह सारखे तर अजून फार गंभीर आजार आहेत मग फक्त मधुमेही च का? त्याच सोप्प्या भाषेत तुम्हाला उत्तर देतो.

बघा ! कोरोना झाल्यावर रुग्णाला अतिशय वीकनेस येतो हे तर तुम्हाला माहीतच असेल. का येत असेल हा विकनेस? तर कोरोना सोडा कोणताही आजार झाल्यावर त्यावर आधी आपलं शरीर उपचार करायला सुरवात करून देत असतं. म्हणजेच आपल्या शरीरातल्या पांढर्या पेशी (White Blood Cells) या कोरोना विषाणू सोबत लढतात आणि कमी होत चालतात, परिणामी रुग्णाला अशक्त पणा जाणवतो.

त्यांनतर उपचार दरम्यान रुग्णाला इम्युनो सर्प्राइसेस च्या मेडिसिन पण चालू असतात, अशा वेळेस सुद्धा high dose स्टिरॉइड (STEROID) दिले जातात, आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्टिरॉइड घेते तेव्हा तिची प्रतिकारशक्ती कमी होते आणि साखरेची पातळी वाढते. आणि परिणामी कोरोना उपचार दरम्यान शुगर लेवल वर सुद्धा नियंत्रण राहत नाही.
याच सगळ्या गोष्टी ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) होण्यास पुरेशा आहेत. कारण त्या आजाराला बरोबर याच गोष्टी हव्या असतात, ज्या मधुमेह असणाऱ्या कोरोना रुग्णाला कंट्रोल मध्ये ठेवणे जवळ जवळ शक्य नसते.

आणि म्हणूनच हा आजार मधुमेहींसाठी जास्त धोकादायक मानला जात आहे.

सर्वात महत्वाचा उपाय यावर एकच आहे, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी न चुकता आपली शुगर लेवल रोज तपासावी. आणि ती कंट्रोल राहील याची दक्षता घ्यावी. डॉ. तात्याराव लहाने यांनी ABP माझा न्यूज वर मुलाखत देताना सांगितले कि, जर आपला आजार नियंत्रित असेल तर हा म्युकरमायकोसिस आजार तुम्हाला होणार नाही.

आम्ही अजून काही उपाय खाली सांगितले आहेत, नक्की वाचा आणि ते अंमलात आणा.

म्युकरमायकोसिस चे लक्षण कोणते आहेत? | Mucormycosis che Lakshan Konte Ahet? | Symptoms Of Mucormycosis In Marathi

Mucormycosis Symptoms, Suggestions. Mucormycosis  after recovered from corona in Marathi.
  1. अंगात सतत बारीक ताप.
  2. नाक गळणे.
  3. गालावर सूज किंवा बधिरपणा येणे.
  4. तीव्र डोकेदुःखी.
  5. वरच्या जबड्यातील दातांचे हलणे.
  6. जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे.
  7. वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे.
  8. जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणे.
  9. तोंडाच्या आतल्या भागाला काळे ठिपके पडलेले दिसतात. किंवा
  10. नाकाच्या भागाला सुद्धा काळे ठिपके पडलेले दिसतात.
  11. सायनस च्या आजूबाजूचा भाग मुखतः डोळ्याचा आजूबाजूचा भाग सुजलेला दिसतो.
  12. डोळ्याचा अगदी खाली जर स्पर्श केला तर जाणवत नाही.

वरील पैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित तुमच्या डॉक्टर कडे जाऊन तपासून घ्या, आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील treatment चालू करा करा. कारण यावर शक्य होईल तेवढं त्वरित उपचार केल्यास हा रोग पूर्णपणे बरा होऊन, तुम्ही तुमचे डोळे, जबडा, मेंदू ला इन्फेकशन होण्यापासून वाचवू शकतात.

म्युकरमायकोसिस आजार टाळण्याचे उपाय | Mucormycosis Talnyache Upay.

Now Serving Breakfast 1 -
  1. आहारात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या गोष्टींचा समावेश करा.
  2. आपले नाक तोड़ साफ ठेवा. ज्याला आपन इंग्लिश मध्ये Oral Hygiene म्हणतो.
  3. मधूमेह असणाऱ्यानी जेवन चावून खान्याकडे जास्त लक्ष दया, कारण वेगाने जेवन केल्यामुळे साखर क्षणात वाढते व कमी होते.
  4. लक्षणे आढळल्यास, शक्य तितक्या लवकर तज्ञांचा सल्ला आणि उपचार घ्या.
  5. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी न चुकता आपली शुगर लेवल रोज तपासावी.
  6. शुगर लेवल कंट्रोल राहील याची दक्षता घ्यावी.
  7. मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टिरॉइड आणि इतर इंजेक्शनचा नियंत्रित वापर करणे.
  8. तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणाने धुणे किंवा वॉश देणे.

म्यूकरमायकोसीस वर उपचार कसा केला जातो ?? | Mucormycosis var Upchar kasa kela jato??

या रोगाचे निदान, सिटी स्कैन (CT Scan), CBCT Scan, किंवा एंडोस्कोपी च्या सहय्याने केले जाऊ शकते. एकदा ,संसर्ग आढळल्यास Anti Fungal Theropy दिली जाते.

  1. सर्वात आधी Steroid आणि शक्तिशाली anti- Boitics देणे त्वरित टाळले जाते.
  2. Blood- Sugar चा स्तर कमी केला जातो.
  3. जर संसर्गामुळे रूगांच्या अवयवावर त्रास होत असेल तर सर्जरी ची वेळ सुद्धा ओढवू शकते.
  4. नाक व नाकपुडयंतिल फंगस ईएनटी सर्जन (ENT Surgen) द्वारे सर्जिकल डेब्रिमेंट (Surgical Debriment) पद्धतीने हटविले जाते. डोळ्यापर्यंत फंगस गेला असेल तर पापन्या काढाव्या लागतात. मेंदू पर्यंत हा Black Fungus गेला असेल तर न्यूरोसर्जरी (Neurosurgery) करावी लागते.

ब्लॅक फंगस म्हणजे काय? | हा फक्त डायबेटीस असणाऱ्या कोरोना रुग्णालाच होतो का?

Black Fungus हा एक बुरशी समूह आहे असं म्हणता येईल. हा जमिनीवर जास्तकरून आढळतो. त्यांनतर हवेत हा कमी प्रमाणात आढळतो. असं समजा कि जिथे जिथे घाण साचलेली असेल किंवा कुजलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, तिथे तिथे हा ब्लॅक फंगस आढळून येतो.

आणि असं नाही कि हा ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) फक्त डायबेटीस असलेल्या कोरोना रुग्णांनाच होतो. हा म्युकरमायकोसिस मधुमेहा सोबत ज्यांना रक्तदाब (Blood Pressure), NGO Plasty , किडनी ट्रान्सप्लांट(Kidney Transplant), HIV असे गंभीर आजार झालेलया व्यक्तींना सुद्धा हा आजार लागू शकतो. परंतु हा आजार १% लोकांनाच होताना आतापर्यन्त दिसलेलं होत. परंतु कोरोना काळात जास्त प्रमाणात लागण होताना दिसून येत आहे.

कोरोना तुन बरे झाल्यांनतर किती दिवसांनंतर लक्षण दिसतात ? | Corona bara zalya nntr Kiti Divsa nntr Lakshan Distat?

साधारण कोरोना बरा झाल्यांनतर याची लक्षणे ३ ते ४ आठवड्यात दिसायला लागतात. ते लक्षणे दिसताच जर रुग्णाने ते अंगावर न काढता त्वरित डॉक्टर ला दाखवले तर नक्कीच हा आजार बरा होऊन रुग्णाचे प्राण वाचू शकतात.

म्युकरमायकोसिस हा आजार शरीरात कोण कोणत्या भागात होतो? | Mucormycosis Body Madhye Kon Kontya Bhagat Hoto?

हा आजार होत असताना,

  1. पहिला आजार आपल्या नाकात जे सायनसिस आहे तिथे होत असतो, आणि तिथून तो मेंदू मध्ये जात असतो.
  2. दुसरा आजार होतो तो आपल्या फुफुसात होऊ शकतो.
  3. तिसरा आजार आपल्या पोटात (Intestine) मध्ये आतडी ला होऊ शकतो.
  4. आणि चौथा आजार हा कातडी (SKIN) ला होऊ शकतो.

म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाचा आहार काय असावा? | Mucormycosis Jhalelya Rugnacha Aahar (Diet) Kay Asava?

म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्नाने काय खावे काय नाही खायला पाहिजे. सविस्तर जाणून घेऊया,
जस कि आपण आधीच समजून घेतलय कि या रोगा मध्ये रोग प्रतिकारक्षमता फार महत्वाची आहे. म्हणून आहारात आपण जे प्रथिनयुक्त अन्न जे आहेत जसे कि,

मांसाहार अंडी, चिकन, मटण खायला पाहिजे. त्यांनतर दूध, डाळी ,इत्यादी… अशा सगळ्याचा सेवन रुग्णाने केल पाहिजे.

म्यूकरमायकोसिस झाल्यावर कोणते औषध दिले जातात? | त्यांची किंमत? | Mucormycosis Jhalyavr Konte Aushadh Dile Jatat?| Cost Of The Medicine in Marathi

म्यूकरमायकोसिस चा संसर्ग झाल्यास एमफोटेरेसिन बी Amphotericin B सारख्या anti-Fungal औषधे किंवा Lysosome Formula ला महत्व दिले जाते. ते नसांद्वारे दिले जातात, आणि साइड इफेक्ट्स चा धोका असल्याने तदण्यांचे निरीक्षण असणे आवश्यक असते. काही प्रकरणात पोसेकेनेजोर किंवा Econazole दिली जाते.
हि सर्व औषधे महागड़ी आहेत आणि काही महीने रुग्णाला ही घ्यावी लागतात. एक एंटी-फंगल इंट्राव्हेनस (Anti-Fungal Intravenous Injection) इंजेक्शन, ज्याची किंमत 3500/- रुपये (48$ डॉलर) आहे आणि दररोज आठ आठवड्यांपर्यंत द्यावी लागते, हे या रोगाविरूद्ध एकमेव औषध आहे.

म्हणून लक्षन आढ़ळल्यास अजिबात अंगावर काढून स्वतः चा जीव धोक्यात टाकू नये. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Maharashtra Govt Announces Free Treatment For Patients Suffering Frohm ‘Black Fungus’ | ‘ब्लॅक फंगस’ पासून ग्रस्त रूग्णांवर मोफत उपचारांची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली.

११ मे रोजी मंगळवारी झालेल्या महत्त्वपूर्ण घडामोडीत महाराष्ट्र सरकारने ‘ब्लॅक फंगस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या म्युकरमायकोसिस ने ग्रस्त रूग्णांवर मोफत उपचारांची घोषणा केली. हे राज्य सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या तत्वाखाली चालू केली जाईल. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, त्यांच्या जिल्ह्याने काही जिल्ह्यातील कोविड -१ रूग्णांमध्ये मुकोरमायकोसीसच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. शिवाय, याबाबत जागरुकता मोहीम राबविली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

(PDF) Mucormycosis Free Treatment Hospital “List” In Maharashtra | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List In Marathi PDF

महाराष्ट्र सरकारने ‘ब्लॅक फंगस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या म्युकरमायकोसिस ने ग्रस्त रूग्णांवर मोफत उपचारांची घोषणा केली. हे राज्य सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या तत्वाखाली चालू केली जाईल. (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List In Marathi PDF)

त्यात महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत येणारे १००० हॉस्पिटल्स मध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत. हात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्या मध्ये कोणते हॉस्पिटल्स आहेत याची PDF आम्ही तुम्हाला देत आहोत. Mucormycosis Free Treatment Hospital “List” In Maharashtra PDF)

Mucormycosis Free Treatment Hospital “List” In Maharashtra | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List In Marathi

त्यात महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत येणारे १००० हॉस्पिटल्स मध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत. हात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्या मध्ये कोणते हॉस्पिटल्स आहेत चला बघूया.

Mucormycosis Free Treatment Hospital List In Pune With Contact Number | पुण्यातील म्युकरमायकोसिस वर मोफत उपचार करणारे दवाखाने

S.NoMucormycosis Free Treatment Hospital name District MCO Contact Number
1. Accord Hospital, ACCHPune9689920815
2.Apex Hospital, AXLPune9767114008
3.Atharva Accidental Hospital, ATTPune8308018000
4.Aundh Institute Of Medical Science, AIMSAPune9225836050
5. Baner Jumbo Covid Center, BJJCPune9689931118
6.Baramati Hospitals, Pune9822402772
7.Bhandare Hospitals, BHAHOPune9860406608
8. Bharati Hospital & Research Center, Pune9225579941
9. Bhimashankar Hospital, BIAHKPune9970326457
10.COEP Jumbo Covid CenterPune9689931118
11.Care Multispeciality Hospital, CMUPune
12. Chakan Criticare Hospital, Pvt. ltdPune
13.Deoyani Multispeciality Hospital, DEYPune9850811722
14.Desai Agricultural & General Hospital, DAAGHPune9623872243
15.District Hospital, Pune, DHPPune9422244232, 9734310939
16.Dr. Mate Hospital, DMATHPune9029438939
17.Galaxy Care multispecialty hospital Pvt Ltd , GCMPune9822097687
18. Get Well Multispeciality Hospital, GETMHPune7588680340
19. Global Hospital & Research Institute, GRIPune7588680340
20.Jehangir Hospital, JHNIHPune8888851125

Mucormycosis Free Treatment Hospital List In Mumbai With Contact Number | मुंबईतील म्युकरमायकोसिस वर मोफत उपचार करणारे दवाखाने

S.NoMucormycosis Free Treatment Hospital name District MCO Contact Number
1. APEX HOSPITALS, AxH MUMBAI & MUMBAI SUBURB
Mumbai9869165290
2.B Y L Nair Hospital , BYL MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai02223027102
3.BAI JERBAI WADIA HOSPITAL FOR CHILDREN & NOWROSJEE WADIA MATERNITY HOSPITAL , BAI MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9821650465
4.BKC COVID JUMBO FACILITY , BCJFM MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai7972271171
5. Bhagawati Hospital Borivali , BHB MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9689931118
6.Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Mun. Gen. Hospital, Kandivali (W) , BAH MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9768426687
7.Brahma Kumaris GHRC managing BSES MG Hospital, BKH MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9833439697
,9967570659
8. Cama and Albless Hospital , CAH MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9967950748
9. Dalvi Nursing Home, DALNH MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9970326457
10.Dr Bhatias Hospital , DBHH MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai8692950277
11.Dr. R. N. Cooper Hospital , Juhu , RNC MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai8879550928
12.Dr.Meenas Multispeciality Hospital , Bhandup , DMMHB MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9930902063
13.General Hospital Malvani, Dist. Mumbai , GHMDM MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9850811722
14.General Hospital Rajawadi , GHR MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9819071436
15.Gokuldas tejpal hospital , GTH MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai08169647508
16.Grant Medical College and JJ Group of hospitals, GMC MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9320385602
17.H. J. Doshi Ghatkopar Hindu Sabha Hospital , HJD MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9819864562
18. HCG APEX cancer centre , HCG MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9137861277
19. Hindu Hruday Samrat Balasaheb Thakre Trauma care Municipal Hospital Jogeshwari East, HHSBT MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9892054472
20.K.B Bhabha Hospital Bandra (W), KBH MUMBAI & MUMBAI SUBURBANMumbai9821956348
,8369177588

Mucormycosis Free Treatment Hospital List In Mumbai With Contact Number |नाशिकमधील म्युकरमायकोसिस वर मोफत उपचार करणारे दवाखाने

S.NoMucormycosis Free Treatment Hospital name District MCO Contact Number
1. ADARSH HOSPITAL,ADARSNASHIK9011061789
2.APEX WELLNESS HOSPITAL LLP , WEXANASHIK9881151052
3.Astha Multispeciality Hospital Pimpalgaon, ASMHNASHIK9604199911
4.DEOLALI SUPER SPECIALITY HOSPITAL, DSSHNASHIK9960036999
5. Deolali Cantonment Board Hospital , DCBHNASHIK9999999999
6.Dhanwantari multispeciality hospital , DWNNASHIK9768426687
7.District Civil Hospital , DTHNASHIK9822478726
8. Dr. Zakir Husen Rugnalay, Kathada, Nashik , DZHKNASHIK9405594711
9. Dr.Anjali Vishnu Hospital , JADVNASHIK9767480978
10.Dr.Vasantrao Pawar Medical College Hospital & Research Center, Adgaon, Nashik ,PVRNASHIK7588176413
11.GENERAL HOSPITAL MALEGAON , GMGNASHIK9975883057
12.HCG Manavta Pvt Ltd , CMCNASHIK08275095018
13.HEART & SOUL SUPER SPECIALITY HOSPITAL , HSSSNASHIK
14.Janseva Hospital , JHNNASHIK9822425015
15.Karuna Hospital Manmad , KARUNASHIK
16.LOTUS MULTISPECIALITY HOSPITAL , LOTUNASHIK
17.Life Care hospital , LIFNASHIK9225103331
18. M.NAGARAJ NURSING HOME AND UROLOGY CENTER , MNNHNASHIK
19. MAHASAISIDDHI MULTISPECIALITY HOSPITAL , MASDNASHIK
20.MATOSHRI HOSPITAL , MATHNASHIK

FAQ About Mucormycosis In Marathi

म्युकरमायकोसिस संसर्गजन्य रोग आहे का?

म्युकरमायकोसिस संसर्गजन्य रोग नाही. तो एकापासून दुसऱ्याला होत नसतो.

म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाचा आहार काय असावा?

प्रथिनयुक्त अन्न जसे कि, मांसाहार अंडी, चिकन, मटण खायला पाहिजे. त्यांनतर दूध, डाळी ,इत्यादी… अशा सगळ्याचा सेवन रुग्णाने केल पाहिजे.

कोरोना तुन बरे झाल्यांनतर किती दिवसांनंतर लक्षण दिसतात ? | Corona bara zalya nntr Kiti Divsa nntr Lakshan Distat?

कोरोना बरा झाल्यांनतर याची लक्षणे ३ ते ४ आठवड्यात दिसायला लागतात.

म्युकरमायकोसिस फक्त डायबेटीस असणाऱ्या कोरोना रुग्णालाच होतो का?

हा म्युकरमायकोसिस मधुमेहा सोबत ज्यांना रक्तदाब (Blood Pressure), NGO Plasty , किडनी ट्रान्सप्लांट(Kidney Transplant), HIV असे गंभीर आजार झालेलया व्यक्तींना सुद्धा हा आजार लागू शकतो.

म्युकरमायकोसिस कसा पसरतो?

हे फंगल इन्फेकशन सामान्यत: फुफ्फुसात आणि त्वचेमध्ये सुरू होते. म्युकरमायकोसिस मध्ये जंतु हे श्वासोच्छवासाद्वारे आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि विविध अवयवांचे नुकसान करतात.

1 thought on “(12Points) Mucormycosis in Marathi | Symptoms Remedies Treatment & Precautions | Mucormycosis & Corona in Marathi|”

Leave a Comment

close