पीएसआय कसे बनता येते | PSI Information in Marathi | पोलीस उपनिरीक्षक पात्रता

नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण पीएसआय कसे बनता येते आणि त्यासाठी काय तयारी करावी लागते या बद्दल बोलणार आहोत..

बऱ्याच लोकांना या विषयी माहिती नसते कि पीएसआय बनण्यासाठी काय करावं लागत ? अभ्यासक्रम काय असतो ? वय किती पाहिजे, शारीरिक आवश्यकता किती? पोलीस उपनिरीक्षक पगार?

अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत ?

चला तर मग बघूया पोलीस उपनिरीक्षक पात्रता

PSI Information in Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी राज्य सरकारच्या सेवतील सुमारे २१ संवर्गातील प्रवर्ग-२, प्रवर्ग-१, तसेच पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, साहाय्यक भरतीसाठी परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या स्पर्धापरीक्षेला दरवर्षी सुमारे तीन-चार लाख विद्यार्थी बसतात. यातील अनेक विद्यार्थी जाणीवपूर्वक तयारी करून परीक्षेला बसतात. परीक्षार्थींच्या मोठय़ा संख्येमुळे स्पर्धा ही अटीतटीची असते. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीला जितक्या लवकर सुरुवात कराल, तितकी यश मिळण्याची शक्यता अधिक असते. जर आपण पदवी परीक्षेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षांला असताना परीक्षेची तयारी सुरू केली तर अभ्यासासाठी अधिक वेळ मिळतो आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. मात्र, काही कारणाने पदवीच्या प्रथम किंवा दुसऱ्या वर्षांला असताना तयारी करणे शक्य झाले नाही तर परीक्षेला बसण्याआधी किमान वर्षभर तरी या परीक्षांची तयारी करणे योग्य ठरते.
सर्वप्रथम राज्य पाठय़पुस्तक मंडळाची इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतची सर्व पुस्तके दोन ते तीन वेळा वाचावीत. मागच्या काही वर्षांत आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यास असे जाणवते की, साधारणत: २५ ते ३० टक्के प्रश्न हे या अभ्यासक्रमावर बेतलेले असतात.

पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचे स्वरूप  | PSI Exam Pattern in Marathi

पोलिस उपनिरीक्षक परीक्षेस बसण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप अवगत असणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप समजून घेऊया.

पोलीस उपनिरीक्षक या गट ब च्या अराजपत्रित पदासाठी शासनाच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग विशेष परीक्षा आयोजित करीत असते . 

परीक्षेचे टप्पे : ही परीक्षा चार टप्प्यांत घेण्यात येते . 

  • पूर्व परीक्षा : ३०० गुण 
  • मुख्य परीक्षा : ४०० गुण 
  • शारीरिक चाचणी परीक्षा : २०० गुण 
  • मुलाखत : ७५ गुण

पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा परीक्षा नमुना | PSI Preliminary Exam Pattern in Marathi


परीक्षेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्नांची संख्या – 100
एकूण गुण – 100
परीक्षेचा कालावधी – 1 तास
परीक्षेचे मानक (दर्जा) – पदवी
परीक्षेचे माध्यम – मराठी व इंग्रजी
परीक्षेचे स्वरूप पाहता (बहुपर्यायी) मोजक्या र्शमात उमेदवारांना अभ्यासक्रमाचा डोंगर कसा सर करता येईल यावर भर द्यावा लागणार आहे. आयोगाने नुकतेच विविध पदांसाठी घेतल्या जाणार्‍या मुख्य परीक्षांकरिता असलेल्या अभ्यासक्रमात बदल केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतही बर्‍याच उमेदवारांच्या मनात गोंधळ असेल. परंतु आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा या अभ्यासक्रमात कुठलाही बदल केलेला नसून तो पूर्वीसारखाच आहे. अभ्यासक्रमाचा आवाका समजून घेण्यासाठी आयोगाने या परीक्षेकरिता जाहीर केलेला अभ्यासक्रम पूर्ण नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे संदर्भ पुस्तके वाचताना कोणत्या भागाला किती महत्त्व द्यायचे ते विद्यार्थ्यांना ठरवता येते. (हा अभ्यासक्रम हा आयोगाच्या www.mpsc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे).

पीएसआय मुख्य परीक्षा अभ्यासक्रम | MPSC PSI Mains Syllabus in Marathi

MPSC PSI Mains : Paper 1 (Syllabus)

पेपर क्रमांक – 1 (मराठी व इंग्रजी)

मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्‍नांची उत्तरे

इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

MPSC PSI Mains : Paper 2 (Syllabus)

पेपर क्रमांक – 2 (सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान  – या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

  1. चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
  2. बुद्धिमत्ता चाचणी
  3. महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राच्या रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पुर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्‍न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.
  4. महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ
  5. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रसतावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
  6. माहिती अधिकार अधिनियम – 2005
  7. संगणक व महिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (case law) नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी.
  8. मानवी हक्क व जबाबदार्‍या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानव, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदार्‍या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा या सारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
  9. मुंबई पोलीस कायदा
  10. भारतीय दंड संहिता
  11. फौजदारी प्रक्रिया संहिता – 1973
  12. भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act.)

पीएसआय होण्यासाठी शैक्षणिक पात्रता | PSI Shaikshanik Patrata

  1. या परीक्षेसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे.
  2. त्यास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे . 

पीएसआय होण्यासाठी वय मर्यादा | PSI Age Limit in Marathi :

आयोगाने विहित केलेल्या दिनांकास उमेदवाराचे वय किमान १ ९ वर्षेकमाल २८ वर्षे इतके असणे आवश्यक आहे .

मात्र सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही उच्चवयोमर्यादेची अट ३ वर्षांनी शिथिलक्षम असते . तसेच खेळांडूसाठी ही अट ५ वर्षांनी शिथिलक्षम असते .

पीएसआय होण्यासाठी शारीरिक पात्रता :

  •  पुरुष उमेदवारांकरिता – उंची – १६५ सें . मी . ( अनवाणी ) कमीत कमी पाहिजे .
  •  महिला उमेदवारांकरिता – उंची – १५७ सें . मी . ( अनवाणी ) कमीत कमी पाहिजे .

पुरुषांसाठी छाती : 

  1. न फुगवता ७९ सेमी 
  2. फुगवण्याची क्षमंता : ५ सेमी 

शारीरिक क्षमता चाचणी परीक्षा :

 एकूण २०० गुण लेखी परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आयोगाच्या सूचनेप्रमाणे योग्य दिनांकास व ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागते . उंची व छाती यांसंबंधी मोजमापाच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच शारीरिक चाचणी घेतली जाते. . 

शारीरिक चाचणीचा तपशील | पीएसआय Physical टेस्ट :

Physical टेस्ट मध्ये तुम्हाला  गोळाफेक,लांब उडी, धावणे, पूल अप्स या टेस्ट असतात आणि त्याद्वरे तुम्हाला मार्क्स दिले जातात. या परीक्षेत किमान १०० गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची मुलाखत आयोगाच्या सूचनेनुसार विहित दिनांकास विहित ठिकाणी घेतली जाते . 

  • पुरुषांसाठी 
  1.  गोळाफेक – वजन ७.२६० कि . ग्रॅ . कमाल गुण = ३० 
  2.  पुल अप्स -कमाल गुण = ४० कमाल गुण % ३० 
  3.  धावणे ( ८०० मीटर्स ) – कमाल गुण = १०० 
  4.  लांब उडी -४० 
  • महिलांसाठी 
  1.  गोळाफेक : वजन ४ कि . ग्रॅ . कमाल गुण 
  2.  धावणे ( २०० मीटर्स ) : कमाल गुण : 20 
  3.  चालणे ( ३ कि . मी . ) ; कमाल गुण : ८० 

पीएसआय मुलाखत/PSI Interview : 

या ७५ गुणांच्या परीक्षेसाठी अर्जातील भरलेल्या माहितीनुसार सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते . पोलीस उपनिरिक्षक या पदावर नियुक्त होण्यास उमेदवार कितपत सक्षम आहे हे मुलाखतीद्वारे तपासले जाते . या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांचे उमेदवाराला किती भान आहे तसेच राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या चालू घडामोडींविषयक ज्ञान तपासण्याच्या दृष्टीने उमेदवारास प्रश्न विचारले जातात.

अंतिम निकाल : 

लेखी परीक्षा , शारीरिक चाचणी परीक्षा आणि मुलाखत प्राप्त गुणांची बेरीज करून उमेदवारांची निवड केली जाते . निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जातो . 

यानंतर मग ३ घी राऊंड नंतर सिलेक्ट झालेल्या उम्मीदवाची लिस्ट लावली जाते आणि नंतर जे सिलेक्ट होतात त्यांना ट्रेनिंग साठी बोलवलं जात.

अश्या प्रकारे असतो पीएसआय बनण्याचा प्रवास.

मित्रांनो वरील माहितीत जर काही चुकलं असेल तर कंमेंट मध्ये कृपया सांगा आम्ही तशी ती माहिती बदलू.

पीएसआय पदासाठी Apply कस कराल ?

या साठी महारष्ट्र लोकसेवा आयोगा कडून जहिरात दिली जाते, तेव्हा तुम्ही याविषयी जास्त माहिती त्यांच्या official वेबसाईट वर जाऊन घेऊ शकतात आणि मग त्यासाठी apply करू शकतात..

maharashtra lokseva ayog website

निष्कर्ष :

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की पीएसआय कसे बनता येते ( पोलीस उपनिरीक्षक पात्रता )

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

इतर ब्लॉग पोस्ट,

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 

धन्यवाद !!

6 thoughts on “पीएसआय कसे बनता येते | PSI Information in Marathi | पोलीस उपनिरीक्षक पात्रता”

  1. Sir mla pan PSI honyac maj dream ahe pan maja khara made kahe problem ahet. Taya problem mule maj study made man lagth nahi. Me kay karave?

    Reply
    • Problem kiti hi asudya, pan jar tumcha mindset strong & positive asel tr tumhala tyacha kahi jast farak padnar nahi :

      kahi books aahet je me recommend karto –

      The Magic of Thinking Big
      Power of Your Subconscious Mind
      Atomic Habits

      Adhik mahiti sathi tumhi hi post check kara –

      Books For Students

      Reply
  2. Sir 2023 मधे पूर्व मेन्स आणि मुलाखत होईल का…म्हणजे 1 वर्षात हे 3 टप्पे पूर्ण होतात का?
    किमान वयोमर्यादा ओपन category साठी ३१ आहे ना?
    पूर्व आणि मेन्स दोन्ही बहुपर्यायीच असतात ना?

    Reply

Leave a Comment

close