(Lyrics,PDF,MP3) Sai Baba Shej Aarti, Marathi, Hindi, English

साई बाबा झोपायला जाण्यापूर्वी रात्री शेजारती रात्री १०:३० वाजता (रात्रीची वेळ) केली जाते. खाली दिलेली शेज आरती वेगवेगळ्या भागात विभागली गेली आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक आरती व्यवस्थित समजून म्हणता येईल. या पोस्ट मध्ये, shej aarti lyrics in marathi, hindi, english दिलेले आहेत. त्यांनतर sai baba Shej Aarti Lyrics PDF, Sai Shej Aarti MP3 सुद्धा तुम्हाला या एकाच पोस्ट मध्ये मिळून जाईल.

Sai Baba Shej Aarti lyrics in Marathi & Hindi

पांचाही तत्वांची आरती |  पांच सिद्धांतों की आरती

ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथा, माझ्या साईनाथा ।।
पाचाही तत्वांचा दीप लाविला आतां ।।

निर्गुणाची स्थिती कैसी आकारा आली ।।
सर्वां घटीं भरूनि उरली साई माउली ।। ओवाळू० ।।

रज तम सत्व तिघे माया प्रसवली ।।
मायेचिये पोटीं कैसी माया उद्भवली ।। ओवाळू० ।।

सप्तसागरी कैसा खेळ मांडिला ॥
खेळूनिया खेळ अवघा विस्तार केला ।।ओवाळू।।

ब्रह्मांडीची रचना कैसी दाखविली डोळां ॥
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ।। ओवाळू।।

आरती ज्ञानरायाची | आरती ज्ञानराय की

आरती ज्ञानराजा ।। महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।। आरती ज्ञानराजा ।।

लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ।।१।। आ.।।

कनकाचे ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो । सामगायन करी ।।२।। आ.।।

प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केले ।
रामजनार्दनीं । पायी मस्तक ठेविलें ॥३॥आ.।।

आरती तुकारामाची |  आरती तुकारामा की

आरती तुकारामा । स्वामी सद्गुरूधामा ।
सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवीं आम्हां । आरती तुकारामा ।।धु० ।।

राघवें सागरांत ।जैसे पाषाण तारिलें ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिलें ॥१॥

तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ।
म्हणोनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥२॥

जय जय साईनाथ शेज आरती

जय जय साईनाथ आतां पहुडावें मंदिरी हो ।
आळवितो सप्रेमें तुजला आरति घेऊनि करी हो ।
जय जय साईनाथ आतां पहुडावें मंदिरी हो ।। ध्रु०॥

रंजविसी तू मधुर बोलुनि माय जशी निज मुला हो ।
भोगिसि व्याधी तूंच हरूनियां निजसेवकदुःखाला हो ।।
धावुनि भक्तव्यसन हरिसी दर्शन देसी त्याला हो ।
झाले असतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो ।
जय० ॥१॥

क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो ।
घ्यावी थोडी भक्तजनांची पूजनादि चाकरी हो ।
ओवाळितों पंचप्राण, ज्योति सुमती करी हो ।
सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ।।
जय० ।।२।।

सोडुनि जाया दुःख वाटतें देवा त्वच्चरणांसी हो ।
आज्ञेस्तव हा आशीर्प्रसाद घेउनि निजसदनासी हो ।
जातों आतां येऊं पुनरपि त्वच्चरणाचे पाशीं हो।
उठवू तुजला साईमाउले निजहित साधायासी हो ।।
जय० ॥३॥

आता स्वामी सूखे शेज आरती

आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता । बाबा करा साईनाथा ।।
चिन्मय हे सुखधामा जाउनि पहुडा एकांता ।।

वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला । बाबा चौक झाडीला ।
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ।। आतां ॥१॥

पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती । बाबा नवविधा भक्ती ।
ज्ञानाच्या समया लावुनि उजळल्या ज्योती ।। आता० ।।२||

भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला । हृदयाकाशीं टांगिला ।।
मनाची सुमने करूनि केलें शेजेला ।। आतां० ।।३।।

द्वैतांचे कपाट लावुनि एकत्र केलें । बाबा एकत्र केलें ॥
दुर्बुद्धीच्या गांठी सोडूनि पडदे सोडिले ।। आता० ।।४।।

आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनि गलबला । बाबा सांडुनि गलबला ॥
दया क्षमा शांति दासी उभ्या सेवेला ।। आता० ।।५।।

अलक्ष्य उन्मनी घेउनी बाबा नाजुक दुशाला । बाबा नाजुक दुशाला ॥
निरंजन सद्गुरू स्वामी निजे शेजेला ।। आतां ।।६।।

सद्गुरु साईंनाथ महाराज की जय । श्री गुरुदेव दत्त ॥

 प्रसाद मिळण्याकरिता (अभंग ) |  प्रसाद पाने के लिए (अभंग)

पाहें प्रसादाची वाट । द्यावें धुवोनिया ताट ॥१॥
शेष घेउनी जाईन ।तुमचें झालिया भोजन ।।२॥
झालों एकसवा । तुम्हा आळवोनीया देवा ॥३॥
तुका म्हणे चित्त । करूनि राहिलो निवांत ॥ ४ ॥ शेष० ।।

प्रसाद मिळाल्यावर (पद) |  प्रसाद प्राप्त करने के बाद (पद)

पावला प्रसाद आतां विठों निजावें, बाबा आता निजावे।
आपुला तो श्रम कळों येतसे भावें ॥१॥

आतां स्वामी सुखें निद्रा करागोपाळा, बाबा साई दयाळा।
पुरले मनोरथ जातो आपुले स्थळा ।।२।।

तुम्हांसी जागवू आम्ही आपुल्या चाडा, बाबा आपुल्या चाडा।
शुभाशुभ कर्मेदोष हरावया पीडा ।।३।। आतां स्वामी…

तुका म्हणे दिधलें उच्छिष्टांचे भोजन,
उच्छिष्टांचे भोजन। नाहीं निवडिलें आम्हां आपुल्या भिन्न ।।४।। आतां स्वामी…

ॐ राजाधिराज योगिराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरु साईंनाथ महाराज की जय ।

(MP3) Sai Shej Aarti MP3

Sai Shej Aarti Video

https://youtu.be/2x2y3fODr2E

Also Read

Leave a Comment

close