(PDF) शिवाजी कोण होता पुस्तक। Shivaji Kon Hota Book PDF

नमस्कार मित्रांनो पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत:आम आदमी’चा राजा होता, ते Shivaji Kon Hota Book यामध्ये दाखवून दिलं आहे.

Shivaji Kon Hota Book Summary :

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं एक थोर रत्न. ज्यांच्या कर्तुत्वाचे दाखले जगभर दिले जातात त्या शिवाजी महाराजांना आपण मात्र केवळ राजकारणासाठी वापरतो, ही दुर्दैवी बाब आहे. या गोष्टीला ज्याप्रमाणे समाजातील काही स्वार्थी प्रवृत्ती कारणीभूत आहेत, त्याचप्रमाणे समाजातील एक नागरिक म्हणून आपण देखील कारणीभूत आहोत. महाराजांवर उगाच वाद उकरून कोणीतरी उभा राहतो आणि आपण देखील त्यात आपलं ‘योगदान’ देऊन त्या वादाचं महत्त्व वाढवतो, त्याला प्रसिद्धी देतो. त्याचा परिणाम असा होतो की सत्तापिपासू लोक त्याचं राजकारण करतात.


खरं तर आपल्याला माहीतच नाही की आपला राजा कसा होता आणि त्यामुळेच आपली ही दुबळी अवस्था झालीये. काही वर्षांपूर्वी प्रा. गोविंद पानसरेंनी “शिवाजी कोण होता” हे पुस्तक लिहिलं होतं. आपले छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे होते याचे उत्तम वर्णन करून महाराजांच्या नावाने शंख फुकीत राजकारण करणाऱ्यांवर प्रा. गोविंद पानसरेंनी चांगलेच आसूड ओढले होते. त्या पुस्तकावरूनही वाद आणि नंतर राजकारण झालं हे तुम्हाला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. प्रा. गोविंद पानसरेंच्या हत्येनंतर पुन्हा हे पुस्तक चर्चेत आलं होतं.

Shivaji Kon Hota Book Information:

LanguageMarathi
BindingPDF(E-Book)
PublisherLokvangmaya Griha
Pages82
Summary इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. कारण इतिहासाचं विकृतीकरण करून या थोर पुरुषांची खरं तर बदनामीच झालेली असते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी `शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी २२ वर्षांपूर्वीच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ८२ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेलं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व, हे कोणाला सातशे पानं लिहून जमणार नाही, इतकं प्रभावी आहे.

Shivaji Kon Hota Book Download Here:

Shivaji Kon Hota Book Audiobook –

धन्यवाद

Others

Leave a Comment

close