तुम्हाला माहित आहे का की आता UPI पेमेंट करण्यासाठी तुम्हाला नेहमी इंटरनेट कनेक्शनची गरज भासणार नाही ? अनेक वेळा यूपीआय वापरकर्त्याला इंटरनेट समस्या मुळे यूपीआय पेमेंट करण्यात अडचणी येतात, त्यामुळे प्रक्रियेत व्यत्यय येतो. परंतु यूपीआयद्वारे पेमेंट करण्यासाठी ऑफलाइन मोड देखील उपलब्ध आता केले आहे.
UPI वापरकर्ते *99# USSD कोड वापरून ऑफलाइन मोडमध्ये त्यांच्या फोनद्वारे पेमेंट करू शकतात. तथापि, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की *99#द्वारे मोबाईल द्वारे UPI पेमेंट करण्यासाठी, वापरकर्त्यांचा मोबाईल नंबर त्यांच्या बँक खात्यांशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
इंटरनेट कनेक्शनशिवाय UPI पेमेंट
ऑफलाइन मोडमध्ये UPI पेमेंट करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा:
- तुमच्या फोनचा डायलर उघडा आणि *99# वर कॉल करा
- त्यानंतर भाषा निवडण्यास सांगणारा संदेश येईल, तुम्हाला इंग्रजी हवी असल्यास तुमची पसंतीची भाषा निवडा, 1 दाबा
- त्यानंतर अनेक पर्यायांसह एक मेनू दिसेल. फक्त पैसे पाठवायचे असल्याने, 1 दाबा आणि पाठवा
- आता, रिसीव्हरला UPI वापरून पैसे भरायचे आहेत तो पर्याय निवडा. तुम्हाला मोबाईल नंबर वापरून करायचे असल्यास, पर्याय 1 निवडा
- यानंतर, मोबाईल नंबर टाका ज्यासह प्राप्तकर्त्याचे बँक खाते जोडलेले आहे
- आता तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम लिहा आणि पाठवा बटन दाबा आणि पेमेंटबद्दल टिप्पणी लिहा
- अंतिम टप्प्यासाठी, आपला UPI पिन प्रविष्ट करा
- यानंतर, तुमचा व्यवहार देखील इंटरनेट कनेक्शनशिवाय पूर्ण होईल.
- तुम्ही *99# पर्यायाचा वापर करून तुमचे UPI अक्षम करू शकता
अश्या प्रकारे तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय UPI पेमेंट करू शकतात
Team 360marathi