C Language काय आहे ? C Language Information in Marathi

जर तुम्हाला प्रोग्रामिंग क्षेत्रात करियर करायचं असेल किंवा जर तुम्ही कॉम्पुटर सायन्स ला admission घेतलं असेल तर तुम्हाला सर्वात आधी जी प्रोग्रामिंग languages शिकवली जाते ती म्हणजे c प्रोग्रामिंग भाषा.. 

आज आपण C Language विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसे C Language काय आहे, C Language का शिकावी, आज खूप नवीन आणि c प्रोग्रामिंग पेक्षा पॉवरफुल भाषा आहेत तरी सुरवातीला तुम्हाला C language का शिकवतात, C Language चा उपयोग कुठे होतो

अश्या अनेक प्रश्नांची उत्तर आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत 

चला तर मग introduction पासून सुरु करूया कि c प्रोग्रामिंग भाषा काय आहे  

C Language काय आहे

मित्रांनो c language हि एक जनरल परपोस प्रोग्रामिंग languages आहे, डेनिस रिचे यांनी १९७२ मध्ये AT &Ts बेल टेलिफोन लॅब्रॉटरी मध्ये c बनवली होती.

c language ची सुरवात unix या ऑपरेटिंग सिस्टिम ला तयार करण्यासाठी झाली होती,

c हि लो लेवल language आहे जिचा उपयोग सिस्टिम सॉफ्टवेअर, कंपायलर, ड्रायव्हर्स किंवा embedded सिस्टिम बनवण्यासाठी केला जातो.

c language शिकण्यास सोपी आहे आणि त्यात प्रोग्रामिंग चे सर्व बेसिक कव्हर केलेले आहेत जसे, variable, data types, pointers, strings, array,function इत्यादी

C Language का शिकावी, 

C Language शिकावी कारण :

 • C language मुळे तुमचे प्रोग्रामिंग चे बेसिक क्लिअर होऊन जातात 
 • C Language शिकण्यास सोपी आहे 
 • C Language शिकल्यानंतर दुसऱ्या प्रोग्रामिंग भाषा शिकण्यास सोपं होईल, कारण C Language मध्ये जे कन्सेप्ट आहेत तेच कन्सेप्ट दुसऱ्या भाषेत सुद्धा असतात जसे java languages, तुम्ही जर C Language शिकलात तर जावा समजण्यास खूप सोपी जाईल 
 • C Language फास्ट आणि पॉवरफुल language आहे

tiobe.com हे एक वेबसाईट आहे जी पॉप्युलर प्रोग्रामिंग languages चा सर्वे करते.. या वेबसाईट नुसार २०२० मध्ये सुद्धा c language पहिल्या स्थानावर आहे, यावरून तुम्ही समजू शकतात कि c भाषा केवढी पॉप्युलर आहे

C Language काय आहे ? C Language Information in Marathi

आज खूप नवीन आणि c प्रोग्रामिंग पेक्षा पॉवरफुल भाषा आहेत तरी सुरवातीला तुम्हाला c language का शिकवतात ?

तर याच उत्तर आहे बेसिक concepts समजण्यासाठी 

जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे बेसिक माहिती असतात तर त्यातलं अडवान्स शिकायला जास्त अवघड नसत, 

तसेच c language मध्ये आहे, यात तुम्हाला प्रोग्रामिंग चे बेसिक समजून दिले जातात जसे डेटा type, variable, pointers, कंडिशनल स्टेटमेंट आणि इत्यादी 

आणि यामुळे जेव्हा तुम्ही दुसरी high लेवल language शिकतात तेव्हा ती तुम्हाला शिकायला सोपी जाते 

म्हणून तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये सर्वात आधी c भाषा शिकवतात 

c चा उपयोग कुठे होतो ? 

C Language चा उपयोग खालील कारणांसाठी होतो 

 • embedded सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी 
 • computer driver तयार करण्यासाठी करण्यासाठी 
 • ऑपरेटिंग सिस्टिम किंवा कंपायलर तयार करण्यासाठी 
 • सिस्टिम प्रोग्रॅम तयार करण्यासाठी 
 • database management सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी जसे MySQL, Oracle

आणि अश्या बऱ्याच ठिकाणी c language चा उपयोग होतो.

c प्रोग्रामिंग कशी शिकावी 

जसे आपण बोलण्यासाठी मराठी हिंदी इंग्लिश अश्या भाषा वापरतो तसेच कॉम्पुटर सोबत बोलण्यासाठी आपण प्रोग्रामिंग भाषा वापरतो जसे c..

जसे आपण भाषा शिकण्यासाठी आधी शब्द,उच्चार, अंक इत्यादी शिकतो तसेच प्रोग्रामिंग भाषा शिकण्यासाठी तुम्हाला आधी तिचे बेसिक शिकायचे असतात जसे data types, variables, array, conditional statements इत्यादी

म्हणून जर तुम्हाला c प्रोग्रामिंग शिकायची असेल तर आधी बेसिक पासून सुरवात करावी लागेल

चला तर मग आता पाहूया कि कश्या प्रकारे तुम्ही c प्रोग्रामिंग शिकू शकतात

w3schools.com :

w3schools हि एक अतिशय पॉप्युलर वेबसाईट आहे प्रोग्रामिंग शिकण्यासाठी इथे तुम्हाला अगदी basic पासून तो advanced पर्यंत concept शिकवले जातात ते हि अगदी मोफत.

javatpoint.com :

javatpoint या वेबसाईट वर सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप टॉपिक नुसार शिकवलं जात.

C Language काय आहे ? C Language Information in Marathi
C Language काय आहे ? C Language Information in Marathi
C Language काय आहे ? C Language Information in Marathi

तुम्ही या वेबसाईट ला भेट बाकी माहिती पाहू शकतात

Tutorialspoint.com :

बाकी वेबसाईट प्रमाणेच हि Tutorialspoint सुद्धा c language शिकण्यासाठी उत्तम वेबसाईट आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे इथे तुम्हाला विडिओ सुद्धा पाहायला मिळतात म्हणून तुम्ही वाचून आणि पाहून शिकू शकतात

learn c programming in marathi

Youtube.com

युट्युब वर सुद्धा तुम्ही c प्रोग्रामिंग शिकू शकतात..

अशे बरेच चॅनेल आहेत जे तुम्हाला अगदी सोप्या भाषेत c language शिकवतात,

जसे codewithharry, mysirg इत्यादी

सी (C) आणि सी++ (C++) मध्ये काय फरक आहे

C Language 

 • सी ही Middle Level Programming लँग्वेज आहे.
 • सी ही प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे.
 • सी Top Downl अप्रोच करते.
 • सी मध्ये जेनरिक प्रोग्रामिंग करू शकत नाही.
 • .c ह्या एक्स्टेंशने आपण c चा कोड संपादित(save) करू शकतो.

C++ Language 

 • C++ ही High Level Programming Language आहे.
 • C++ ही Object Oriented Languages आहे.
 • C++ Bottom Up अप्रोच करते.
 • C++ मध्ये Generic प्रोग्रामिंग करता येते.
 • .cpp ह्या एक्स्टेंशने आपण c++ चा कोड save करू शकतो.

सी प्रोग्रामिंग शिकण्यासाठी चांगले पुस्तक कोणते? 

S.K. Shrivastav यांचे C In Depth हे पुस्तक C प्रोग्रामिंग शिकण्यासाठी खूप उत्तम आहे..

c in depth marathi book

तुम्ही हि पुस्तक ऑनलाईन ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकतात

निष्कर्ष 

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की C Language काय आहे ( C Language Information in Marathi )

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

इतर ब्लॉग पोस्ट 

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 

धन्यवाद 

Leave a Comment

close