धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी : भारतीय संस्कृतीत आरोग्य चे स्थान धन चा वरती मानले जाते. ‘पहिले सुख निरोगी शरीर, दुसरे सुख घरात’ ही म्हण आजही प्रचलित आहे, म्हणून दीपावलीत धनत्रयोदशीला प्रथम महत्त्व दिले जाते. जे भारतीय संस्कृतीला पूर्णपणे अनुकूल आहे.
शास्त्रात सांगितलेल्या कथांनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हा विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते. जगात वैद्यकशास्त्राचा विस्तार आणि प्रसार व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरीचा अवतार घेतला. धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीच्या रूपाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
धनत्रयोदशी च्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार चांदी आणि इतर धातू कोणत्याही स्वरूपात खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
या दिवशी लोक पूजा करतात, एकमेकांना धनतेरस च्या शुभेच्छा देतात यासाठी आम्ही हि पोस्ट घेऊ आलोय, ज्यात आम्ही धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, धनत्रयोदशीच्या शुभेच्छा संदेश दिलेले आहेत, तसेच धनत्रयोदशी मराठी स्टेटस देखील दिले आहेत.
तुम्ही हे धनत्रयोदशीच्या या मराठी शुभेच्छा सोशल मीडिया वर देखील शेयर करू शकतात.
तर चला तर मग पाहूया धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 – dhanteras wishes in marathi 2021
आपणास धन, धान्य, ऐश्वर्य,
सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच
ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी 2021
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
दिवाळी अशी खा, तिच्यात
लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुंगधी
सुवास, दिव्यांची सजली आरास,
मनाचा वाढवी उल्हास.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशी फोटो मराठी 2021 – Dhantrayodashi images in marathi 2021.
आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.
- लक्ष्मी पूजन माहिती : केव्हा आहे, तिथी, आणि पूजेची शुभ वेळ | Lakshmi Pujan information in Marathi
- लक्ष्मीपूजन च्या हार्दिक शुभेच्छा 2021 – Lakshmi Pujan Marathi Wishes Quotes Status SMS Images & Banner
धनत्रयोदशी संदेश मराठी 2021 – Dhantrayodashi messages in marathi 2021.
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची
लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.
धनत्रयोदशी स्टेटस
धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा
लागतो दारी कंदिल, पणत्यांनी
उजळून जाते दुनिया सारी फराळ,
फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू
आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
धनत्रयोदशी बॅनर मराठी 2021 – Dhantrayodashi banner in marathi 2021.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख
समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
Dhantrayodashi hardik shubhechha in marathi
धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास
असो तुमच्या जीवनात
दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ
असो यंदाची धनत्रयोदशी
तुमच्यासाठी खास असो
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!
धनत्रयोदशी बॅनर – Dhanteras banner in marathi
धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने, उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीचा हा सण तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर करून तुमच्यावर सुखाची बरसात करो… हिच इच्छा. धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा
आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ
Dhanteras Marathi Whatsapp Status Download
इतर पोस्ट :
- दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
- दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021
- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
- दिवाळी सणाची माहिती
- दिवाळी मराठी निबंध
Team 360marathi