मैत्री कविता | मैत्री चारोळ्या | Friendship poem in Marathi

या पोस्ट मध्ये आम्ही १० पेक्षा जास्त मैत्री कविता, मैत्री चारोळ्या शेयर केल्या आहेत, ज्या तुम्हाला नक्की आवडतील.

#1 ती मैत्री

मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
ती मैत्री……

#2 फ़क्त मैत्री… ( मैत्री चारोळ्या )

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री……..

#3 मैत्री कविता

पहीला दिवस कॉलेजचा,
खुप खुप मजा केली,
एकटेपणाची सवय माझी
हळू हळू विरून गेली..
माझ्याच बसमधे,
माझ्याच वर्गात,
जणू आम्ही दोघे,
नव्या मैत्रीच्या शोधात..
मैत्रीसाठी माझा प्रस्ताव,
माझ्या विनंतीला तीचा होकार,
तेव्हा जाणवले आता मैत्रीच्या झाडाला,
नवी पालवी फुटणार..
मैत्री आमची खुप सुंदर,
एकाकीच्या सागरात जिव्हाळ्याच बंदर,
ती म्हणायची राहूया आपण,
असंच सोबती निरंतर…
तीचा माझ्यावर खुप जिव,
हे तिच्या स्वभावातून कळायचं,
माझ्या अपयशाला,माझ्या चुकीला,
तिच्या डोळ्यातून टीप गळायचं..
ती मला सावरायची ,
माझ्या उदासीला दुर लावायची,
आंनदाची ती श्रावणसर ,
माझ्यावर वेळोवेळी कोसळायची..
मैत्री आमची वाढत गेली,
तसं एकतर्फी प्रेम माझ्यात जागं झालं,
पण मैत्रीला काही होणार नाही ना?
असं भितीच वारं माझ्या मनात आलं
अस्वथ व्हायला लागलो,
दिवसे न दिवस विचार करू लागलो,
तिला कसंतरी कळावं म्हणून,
उगाच प्रयत्न करू लागलो…
कॉलेजच्या शेवटच्या दिवशी,
मी तिला माझ्या मनातलं सांगितलं,
खरतरं आमच्या या नितळ मैत्रीला,
मी तेव्हाच दुर लोटलं..

#4 Old Memories Marathi Kavita

आजही मला ते सर्व
आठवतयं जणू कालचं सारे
घडल्यासारखं |
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात
बसल्यासारखं ||
अजुनही मला आठवतंय
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत
बसायचो |
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो ||

#5 फ़क्त मैत्रीच असते

मैत्री कधीही होते
मैत्री कुठेही होते
नाते मनाशी मनाचे
नकळत पणे जुळते
दोन शब्द बोलता बोलता
मोठे वाक्य होते
हाय बाय करता करता
हृदया पर्यंत जाते
सुरुवात थट्टा मस्करीत
गप्पा गोष्टींत रंगते
इतकी ओढ़ लागते की
सुख दुखही संपते
मैत्री पहावी करून
मैत्री जपावी हरवून
सर्व नात्यांमधे घट्ट
फ़क्त मैत्रीच असते…
फ़क्त मैत्रीच असते…

आशा करतो तुम्हाला हि मैत्री कविता आवडली असेल, आवडली तर शेयर नक्की करा.

टीम ३६०मराठी

Tags : Marathi Maitri kavita, friendship day kavita marathi, friendship day poem in marathi, friendship day marathi charoli , मैत्री म्हणजे काय कविता, माझी मैत्रीण कविता

1 thought on “मैत्री कविता | मैत्री चारोळ्या | Friendship poem in Marathi”

Leave a Comment

close