RIP म्हणजे काय, अर्थ काय? | RIP Full form in Marathi | RIP long-form in Marathi

RIP Full form in Marathi With Meaning – रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण हजारो शब्द बोलत असतो. यातले कित्येक शब्द असे असतात जे आपण शॉर्ट फॉर्म वापरून बोलतो. बोलायला आपण बोलतो परंतु याच शॉर्ट शब्दांचा लाँग फॉर्म च आपल्याला माहित नसतो. बाकीचे बोलतात म्हणून आपण पण बोलतो. बाकी आपल्याला हे शब्द कुठे कसे वापरायचे आहेत हे सर्व माहित असत फक्त अर्थ सोडून.

त्यातलाच एक शब्द म्हणजे RIP. तुम्हाला बऱ्याचदा कोणाची मौत झाल्यावर शोक व्यक्त करताना rip हा शब्द वाचण्यात आला असेल, किंवा तुम्ही सुद्धा RIP लिहून शोक व्यक्त केला असेलच. परंतु तुम्हाला माहिती आहे का या RIP चा अर्थ काय आहे? RIP चा फुल फॉर्म काय असतो? म्हणूनच आज आपण या RIP शब्दाचा फुल्ल फॉर्म आणि अर्थ मराठीमध्ये जाणून घेणार आहोत.

RIP चा फुल फॉर्म काय आहे (RIP full form in marathi)

  • RIP चा फुल फॉर्म Rest in Peace असा असतो.
  • RIP Full Form In Marathi = “आत्म्याला शांती मिळो”. RIP म्हणजेच “Rest in Peace” आणि मराठी मध्ये याचा अर्थ “आत्म्याला शांती लाभो” असा होतो. 

Note – काही लोक RIP ला Return if possible (म्हणजेच शक्य झाल्यास परत या) म्हणतात, परंतु हे चुकीचे आहे. RIP शब्दाचा खरा फुल फॉर्म “Rest in Peace” असाच आहे, ज्याचा मराठी अर्थ “आत्म्यास शांती लाभो “असा होतो.

RIP चा अर्थ काय आहे (RIP meaning in Marathi)

एखादि व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा त्यांच्या प्रति दुःख आणि शोक व्यक्त करताना आपण RIP बोलून शोक व्यक्त करत असतो. आपण मृत व्यक्ती प्रति आदर राखत ईश्वराला प्रार्थना करतो कि “ईश्वरा यांच्या आत्म्यास शांती लाभू दे” कारण माणूस हा असमाधानी असतो असे म्हणतात.

म्हणून जर मृत व्यक्तीची काही इच्छा अपूर्ण राहून हे जग सोडावे लागत असल्यास त्यांना शांतता लाभो अशी आपण ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करून RIP = Rest in Peace / RIP = “आत्म्यास शांती लाभो”असे उद्गार आपण तोंडातून काढतो.

RIP शब्दाचा उगम कुठून झाला (Where did the word RIP come from?)

RIP हा शब्द लॅटिन शब्द Requiescat In Pace पासून आला आहे. RIP हा शब्द प्रथम सोळाव्या शतकाच्या आसपास पाश्चात्य देशांमध्ये वापरला गेला आहे असे इतिहासकार सांगतात. मृत व्यक्तीच्या अंगावर ठेवलेल्या दगडावर याचा पुरावा सापडला आहे. RIP हा शब्द प्रथम ख्रिश्चनांनी वापरला.

ख्रिश्चन धर्मातील लोक मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी दफन केल्यानंतर त्या दगडावर ज्याला इंग्रजी मध्ये “mausoleum किंवा Grave” म्हणतो त्यावर RIP लिहितात. हळूहळू ही गोष्ट जगभर पसरली. आजकाल, हा शब्द सामान्यतः मृत व्यक्तीबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी वापरला जातो.

FAQ About RIP Full Form In Marathi

प्रश्न १) RIP चा मराठीमध्ये अर्थ काय आहे? (What is the meaning of RIP in Marathi?)

उत्तर – RIP चा मराठीमध्ये अर्थ “मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभो”असा आहे.

प्रश्न २) RIP शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? (What is the full form of the word RIP in Marathi?)

उत्तर – RIP शब्दाचा फुल फॉर्म “रेस्ट इन पीस (Rest in peace)” असा होतो.

प्रश्न ३) आरआयपी (RIP) या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे?

उत्तर – “Requiescat In Pace” या लॅटिन शब्दापासून RIP या शॉर्ट शब्दाची उत्पत्ती झाली आहे.

आमच्या इतर पोस्ट,

Team, 360Marathi.in

Leave a Comment

close